बोल्ड, ब्युटीफुल, बिनधास्त असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नावही मागे राहिलेलं कुठे दिसत नाही आहे. आजवर प्राजक्ताने तिच्या अदाकारीने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केलं. शिवाय तिच्या अभिनयाची छाप तिने आजवर मनोरंजन विश्वात पाडलीच आहे. हास्यजत्रेच्या सेटवरील ‘वाह दादा वाह’ या तिच्या वाक्याचे लाखो चाहते आहेत. (Saie Tamhankar On Prajakta Mali)
प्राजक्ताने मालिकाविश्वातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या तिच्या मालिकेने आणि या मालिकेतील तिच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. शिवाय प्राजक्ता विशेष चर्चेत असते ती तिच्या फोटोशूटमुळे. आज प्राजक्ता माळीचा वाढदिवस आहे, आणि यानिमित्त सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंची हवा आहे.
पाहा प्राजक्तासाठी सईची खास पोस्ट (Saie Tamhankar On Prajakta Mali)
चाहत्यांसोबत कलाकार मंडळीही प्राजक्ताला शुभेच्छा देताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्राजक्ताला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्तासोबतच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिने प्राजक्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सईने फोटोसोबत म्हटलं आहे की, “happy happy birthday praju ! आज building मध्ये फरसाण वाटते आहे तुझ्या वतीने !.” सईने प्राजक्तासाठी केलेली ही पोस्ट लक्षवेधी ठरतेय. प्राजक्ताला फरसाण खूप आवडतं, याबाबत बरेचदा उलगडा ही झाला आहे. म्हणूच गमतीत अभिनेत्री सईने प्राजक्तासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
प्राजक्ताने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनात घर केलं. अभिनयासोबतच प्राजक्ता उत्तम कवी देखील आहे. कविता करायला प्राजक्ताला विशेष आवडतं. याशिवाय प्राजक्ताचं ‘प्राजक्तराज’ हे ज्वेलरी ब्रँड देखील विशेष चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने ‘प्राजक्तकुंज’ म्हणून स्वतःच कर्जत येथे फार्महाऊस देखील घेतलं. यावेळी चाहत्यांनी आणि अनेक कलाकार मंडळींनी प्राजक्तावर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला.
प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकर शिवाय अमृता खानविलकर, ऋतुजा बागवे, गौरव मोरे, समीर चौघुले, चेतना भट या कलाकारांनीही स्टोरी पोस्ट करत प्राजक्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.