बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आधी लगीन कोंढाण्याचं…” ‘सुभेदार’ चित्रपटातील ऐतिहासिक क्षणाचं खास पोस्टर प्रदर्शित

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 26, 2023 | 11:44 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
subhedar

subhedar

निष्ठा म्हणजे काय? या प्रश्नाचं समर्पक उत्तर कुठे पाहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या सोबत सह्याद्री सारखे उभे राहिलेलं शूर वीर मावळे यांचा इतिहास उलगडून पाहावा. स्वामीनिष्टेचं एक उत्तम प्रतीक म्हणून महाराजांच्या इतिहासातील एक घटना पाठयपुस्तकापासून ते लहान मुलाच्या जन्मापर्यंत सगळ्यांना सांगितली जाते. ”आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं” हे वाक्य इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं आणि त्याचीच माहिती जगाला व्हावी या साठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहेत शिवराय अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’.(subhedar)

रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन सुभेदार तान्हाजी मालुसरे महाराजांकडे पोहचले पण महाराज आणि माँ साहेब जिजाऊ यांच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून मुलाच्या लग्नाच्या पत्रिका बाजूला ठेऊन कोंढाणा जिंकण्याची शपथ तान्हाजी मालुसरे यांनी घेतली. या ऐतिहासिक क्षणाचं एक चित्र प्रदर्शित करण्यात आलं आहे.

ऐतिहासिक क्षणाचं खास चित्र (subhedar new poster)

तो प्रसंग हुबेहुब डोळ्यांसमोर उभं करणारं ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या कुंचल्यातून अवतरलेलं चित्र आपण बालपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पाहिलं आहे. शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. त्या गाजलेल्या चित्रावरून प्रेरित होऊन नवीन पिढीसाठी हा प्रसंग ‘सुभेदार’ या महत्त्वाकांक्षी आगामी चित्रपटात चलचित्ररूपात पहायला मिळणार आहे.

subhedar new poster

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टिमने प्रचंड मेहनतीने ‘सुभेदार’च्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील एक सुवर्णपान रसिकांसमोर उलगडण्याचं काम केलं आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय पूरकरांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हे देखील वाचा – रायबाची लगीन सराई, सजलं मालुसरे कुटुंब

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.(subhedar)

Tags: Subhedarsubhedar new posterTanahaji malusare
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Sai Tamhankar confessed about Sonali and her husband

सोनाली कुलकर्णी व तिच्या नवऱ्याला सई ताम्हणकरने ठेवलं होतं उपाशी, स्वतःच खुलासा करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.