गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर ‘पाऊस’ वेबसीरिजची घोषणा, पहिले पोस्टर प्रदर्शित, कोण कलाकार असणार?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 12, 2024 | 2:07 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Itsmajja original Marathi web series paus first poster released after aathvi-a success

'आठवी-अ‘ नंतर 'इट्स मज्जा’च्या ‘पाऊस’ या नवीन सीरिजचे पहिले पोस्टर प्रदर्शित.

Itsmajja Original Paus Series : ‘मीडिया वन सोल्युशन्स’ व ‘इट्स मज्जा’ हे कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि त्यामुळेच ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायमच नवनवीन कंटेट घेऊन येत असतात. मनोरंजन क्षेत्रातील विविधता ‘इट्स मज्जा’ने कायमच जपली आहे. याच विविधतेमुळे ‘इट्स मज्जा’ने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘इट्स मज्जा’च्या आठवी अ या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधीसोपी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या ‘आठवी-अ’ सीरिजद्वारे सांगण्यात आली आणि या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या सीरिजने गेले अनेक दिवस प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले.  (Itsmajja series paus first poster)

‘आठवी-अ’ ही सीरिज प्रचंड गाजत होती. मात्र, प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. अशातच या सीरिजने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर होता. पण ‘आठवी-अ’ ही सीरिज संपली असली तरी ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायमच तत्पर असणार आहे. प्रेक्षकांच्या याच मनोरंजनाची हमी घेत ‘इट्स मज्जा’ लवकरच ‘पाऊस’ ही नवीन सीरिज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे आणि ही नवीन सीरिज म्हणजे ‘पाऊस’. ‘पाऊस’ हा कायमच प्रत्येकासाठी स्पेशल असतो. पावसाबरोबरच्या अनेकांच्या आठवणी या अविस्मरणीय असतात आणि या आठवणी बेभान करणार्‍या असतात. त्यामुळे ‘इट्स मज्जा’च्या ‘पाऊस’ या सीरिजद्वारे प्रेक्षकांना बेभान करायला येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सारखं सारखं तेच…” ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन न करण्यावरुन महेश मांजरेकरांचं वक्तव्य, म्हणाले, “होस्ट बदलायचा की नाही…”

नुकताच ‘पाऊस’ या नवीन सीरिजचा मुहूर्त पार पडला. त्यानंतर या सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. अशातच ‘पाऊस’ सीरिजचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या नवीन पोस्टरमध्ये तरुण-तरुणी हातात छत्री घेऊन डोंगराच्या कड्यावर उभे असलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता पाऊस, एक जोडपे आणि या दोघांच्या मागे एक दिसणारे हिरवेगार अरण्य याचे काय साधर्म्य आहे? या सीरिजची नेमकी कथा काय आहे? यात कोणते कलाकार आहेत? याची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.

आणखी वाचा – प्रतिमाला खुश ठेवायला सुभेदार कुटुंबाची धावपळ, तर तन्वी-अर्जुनमधील जवळीकता सायलीला खटकणार?, मालिकेत मोठं वळण

दरम्यान, या नवीन सीरिजची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांचेच असून या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी स्वीकारली आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह हेड अंकिता लोखंडे आहेत. ही सीरिज तुम्हाला ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर पाहता येणार आहे.

Tags: Itsmajja paus Series Marathi NewsItsmajja paus Series Poster Marathi NewsItsmajja series paus first poster
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Bigg Boss Marathi update Arya Jadhav fight

Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांनंतर निक्की तांबोळीचा आर्यावर निशाणा, नको नको ते बोलली, अरबाज-वैभव यांच्याबरोबरही वाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.