आईच्या मायेसारखं सुख जगात कुठे नाही असं म्हणतात. सामान्य माणूस असो व कोणी कलाकार आपल्या लेकरा पासून लांब असला कि भाविनक सारेच होतात. लेकराच्या आठवणीने प्रत्येक आईचा जीव व्याकुळ होतो. आज जागतिक मातृदिन या निम्मित इट्स मज्जा ने आयोजित केलेल्या भाग्य दिले तू मला या मालिकेच्या सेटवरील कलाकारां सोबत एका कार्यक्रमात अभिनेत्री निवेदिता सराफ मुलगा अनिकेतच्या आठवणीत भावुक झालेल्या दिसल्या.(Nivedita Saraf Emotional)
मातृदिनाचं औचित्य साधून इट्स मज्जा ने मालिकेतील इतर कलाकरांना एकत्र करून निवेदिता यांच्या साठी सरप्राईझ आयोजित केलं आणि अचानक सेटवर कलाकार निवेदिता यांच्यासाठी मातृदिन विशेष केक घेऊन पोहचले आणि मुलांचं हे प्रेम बघून निवेदिता यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले पाहायला मिळाले. या प्रसंगी बोलताना निवेदिता सराफ यांनी सांगितले आज सकाळीच त्यांचं अनिकेतसोबत बोलणं झालं आणि या दिवशी अनिकेत नेहमी माझ्या साठी काही ना काही गिफ्ट आणतो असं सांगत त्यांनी अनिकेत सोबतच्या आठवणी सांगितल्या.
निवेदिता सराफ यांनी मालिकेत त्यांच्या सोबत असणाऱ्या तन्वी मुंडले, विवेक सांगळे, पूर्व फडके, जान्हवी किल्लेकर, अमित रेखी या कलाकारांचं देखील भरभरून कौतुक केलं आणि त्यांच्या कामाबद्दल आदर देखील व्यक्त केला.(Nivedita Saraf Emotional)