गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महिपतच्या तावडीतून सायलीची सुखरुप सुटका, तर सायली-अर्जुनमध्ये फुलले प्रेमाचे बंध, बायकोची काळजी घेताना दिसला अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 21, 2024 | 9:41 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

महिपतच्या तावडीतून सायलीची सुखरुप सुटका, तर सायली-अर्जुनमध्ये फुलले प्रेमाचे बंध, बायकोची काळजी घेताना दिसला अन्…

‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाच्या आणि कलाकारांनी मालिकेची उंची वाढविली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेत आलेल्या टर्न अँड ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. (Tharal Tar Mag Serial Update)

सध्या मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत महिपतने आखलेला डाव त्याच्यावरच पलटला आहे. मालिकेत महीपतने सायली विरोधात कट रचलेला असतो. सायलीला त्याने किडनॅप केलेलं असतं. मात्र सायली महिपतच्या तावडीतून सुटून बाहेर येते. सायलीजवळ असलेलं पुराव्यांचं पेन ड्राइव्हसाठी हा सर्व खटाटोप सुरु असतो. सायलीला वाचवून अर्जुन घरातल्यांशी खोटं बोलतो. सायली मंदिरापाठी चक्कर येऊन पडल्याचं तो यावेळी सांगतो. एवढा कडेकोट बंदोबस्त करूनही सायली आपल्या माणसांच्या तावडीतून सुटली कशी हा प्रश्न साक्षीला आणि महिपतला पडतो.

आणखी वाचा – हिंदू नववर्षात मेष व मकरसह ‘या’ पाच राशींच्या व्यक्ती होणार मालामाल, व्यवसायातही मिळणार भरपूर उत्पन्न, कोणाला सर्वाधिक आर्थिक फायदा?

अर्जुन सायलीची काळजी घेताना दिसतो. तो तिचे पाय दाबून देतो. त्यानंतर तो सायलीला ती मार्केटमध्ये गेल्यापासूनचा सर्व घटनाक्रम विचारतो. पण सायली बोलता बोलता झोपते. सायलीला असं शांत आपल्या शेजारी झोपलेल पाहून अर्जुनला बरं वाटत असतं. गुंडांच्या तावडीतून सोडवल्यावर सायलीने मारलेली मिठी ही भीतीची होती की प्रेमाची असा प्रश्न त्याला पडलेला असतो. कॉन्ट्रॅक्टनुसार सायली एका वर्षांनी आपल्याला सोडून जाईल याचीही त्याला भीती वाटत असते.

आणखी वाचा – महेंद्रसिंग धोनीची बॉबी देओलला त्याचा ‘तो’ व्हिडीओ डिलिट करण्याची विनंती, अभिनेता म्हणाला, “डिलिट करेन पण…”

त्यानंतर सायली अर्जुनला तिच्याबरोबर घडलेली सर्व घटना सांगते. तसेच संतोषने आपल्याला महिपत विरोधात पुरावे दिल्याचे देखील सांगते. त्यानंतर सायलीने तो पेन ड्राईव्ह गाडीत लपवला असल्याचं आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तिने डोकं लावून पेन ड्राईव्ह सुरक्षित ठेवला हे जाणल्यानंतर अर्जुन तिच्यावर खूप खुश होतो आणि तिचा हात हातात घेऊन तिचे आभार मानत असतो.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 rakhi sawant latest video
Entertainment

४८ वर्षांची आहे राखी सावंत?, वेस्टर्न लूक पाहून नेटकरी अवाक, ट्रोलही केलं, म्हणाले, “ती स्वस्त…”

जून 18, 2026 | 9:58 am
Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
Next Post
Jheel Mehta On Wedding

'तारक मेहता…' फेम झील मेहता वर्षाअखेरीस उरकरणार लग्नसोहळा, सात नव्हे तर दोन फेरे घेणार अन्…; म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.