रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सत्यनाश केला स्टोरीचा”, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा शेवट पाहून नेटकरी संपातले, म्हणाले, “चांगल्या मालिकेचं वाटोळं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 11, 2025 | 12:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 laxmichya paulanni last episode

"सत्यनाश केला स्टोरीचा", 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेचा शेवट पाहून नेटकरी संपातले, म्हणाले, "चांगल्या मालिकेचं वाटोळं…"

 laxmichya paulanni last episode : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली तेव्हापासून मनात घर करुन आहे. या मालिकेच्या निमित्ताने इशा केसकर आणि अक्षर कोठारी ही जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसली. मात्र काही दिवसांपूर्वीच मालिकेत कला म्हणजेच इशाने मालिका सोडली असल्याची धक्कादायक बातमी दिली. याने चाहतावर्ग बराच नाराज झाला. यानंतर आता मालिकाच संपणार असल्याचं समोर आलं. हे ऐकून अर्थात प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला. मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो वाहिनीने सोशल मीडियावर शेअर करताच प्रेक्षकांनी कमेंट करत मालिकेच्या टीमला ट्रोल केले.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या अंतिम भागाच्या प्रोमोमध्ये, “कलाचा अपघाती मृत्यू दाखविण्यात आला आहे. रोहिणी व राहुल यांनी कट रचून कलाचा जीव घेतला. आणि हे लवकरच समोर येणार आहे. इतकंच नाहीतर रोहिणी चांदेकर कुटुंबियांना जीवे मारण्यासाठी विषारी केक खायला देते पण अद्वैत तिच्या या प्लॅनपासून आधीच सावध होतो. त्यामुळे हा केक चांदेकर कुटुंबीय खात नाहीत आणि रोहिणीच्या खरा चेहरा सगळ्यांसमोर येतो. आणि अद्वैत सगळ्यांसमोर रोहिणीला याचा जाब विचारतो तेव्हा रोहिणी चुकांचा पाढा बोलून दाखवत गुन्ह्याची कबुली देते. यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. हा प्रोमो पाहून नेटकरी संतापले आहेत.

आणखी वाचा – “आमचं दुसरं लग्न…”, ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अण्णा नाईकांची लव्हस्टोरी, म्हणाले, “फेसबुकवर बोलत होतो पण…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेच्या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी, “सिरीयल संपवायची होती तर हैप्पी एंडिंग दाखवून संपवायची होती ना. कला अद्वैतच लग्न दाखवून कला अद्वैत कायम आठवणीत राहिले असते. सत्यानाश केला स्टोरीचा”, “एवढ्या लवकर अपेक्षित नव्हते सिरीयल संपण्याची. सिरीयल पण टॉप १० मध्ये होती. आम्ही मिस करु पण या एपिसोडमध्ये कलाची नुसती झलक दाखवली असती तर खूप छान झाले असते” “‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही मालिका निरोप घेत आहे ही गोष्ट मनाला पटत नाही. कलाची एक्झिट झाल्यानंतर खूपच वाईट वाटले होते. पण नक्षत्रा ताईची इंट्री झाल्यानंतर आम्हाला वाटले की आता मालिकेत थोडेफार चेंजेस होतील पण मालिका चालू राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेचं शीर्षक गीत हे चेतना फुलवणारे व धगधगती आग पेटवणारे आहे. हे संगीत ऐकल्यानंतर मनात संवेदना जाणवू लागतात. मालिकेतील सर्वच कलाकार अतिशय गुणी व उत्तम होते. मालिकेतील माझी आवडती इशा केसकर, अक्षर कोठारी, सानिका बनारसवाले, दिपाली पानसरे यांच्या भूमिका मला खूपच आवडायच्या. मालिकेच्या सर्व कलाकारांना पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा”, अशा कमेंट केल्या.

आणखी वाचा – लेकाच्या जन्मानंतर कतरीना कैफ दिसतेय अशी, नवऱ्यानेच सांगितलं खरं कारण, म्हणाला, “पुरेशी झोप नाही…”

याशिवाय नेटकऱ्यांनी संताप दाखवत, “एका चांगल्या मालिकेच वाटोळे करुन भंगार शेवट केला”, “कला अद्वैतची लव्हस्टोरी पाहायची राहूनच गेली. इशाने सिरीयल सोडणार हे सप्टेंबरमध्ये कळवलं होत म्हणे. मग मॅरिज ट्रॅक दाखवायचा मूर्खपणा कोण करेल. कला अद्वैतचे सीन जरी दाखवले असते तरी कुठेतरी स्टोरी कंप्लिट झाली असती. सगळ्यांनी मूर्खपणा केला”, असंही म्हटलं.

Tags: laxmichya paulannimarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Hemant Dhome upcoming film

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा कलाकारांच्या उपस्थिती संपन्न, शाळेतील विद्यार्थ्यांच्या ऊर्जेने मिळालं बळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.