Allu Arjun Arrested : ‘पुष्पा २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर आज म्हणजेच शुक्रवारी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद येथील त्याच्या राहत्या घरी त्याला अटक केली आहे. दरम्यान, अटकेनंतर अल्लू अर्जुनने कोर्टात जाऊन एफआयआर रद्द करण्याची विनंती केल्याचेही वृत्त समोर येत आहे. अल्लू अर्जुनने अटक केल्यानंतर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली आहे. या अभिनेत्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. ‘पुष्पा २’ अभिनेता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अल्लू अर्जुनच्या अटकेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेता पोलिसांबरोबर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याची पत्नी स्नेहा रेड्डीही दिसली. या व्हिडीओ व फोटोंमध्ये अल्लू पांढऱ्या रंगाच्या कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसत होता. जो पोलिसांबरोबर जाण्यापूर्वी पत्नीला भेटताना दिसला. ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
आणखी वाचा – रेश्मा शिंदेचा नवरा पवन नक्की काय काम करतो?, युकेमध्ये राहत होता पवन, अभिनेत्रीचं पहिल्यांदाच भाष्य
मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा एफआयआर रद्द करण्यासाठी अभिनेत्याने तेलंगणा उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर प्रचंड खळबळ माजवत आहेत. “यात अभिनेत्याचा काय दोष?”, “क्रिकेट सामन्यादरम्यान ही चेंगराचेंगरी झाली असती तर विराट कोहलीला अटक झाली असती का?”, अशा अनेक कमेंट करत अभिनेत्याला पाठिंबा दर्शविला आहे.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनला अटक झाल्यानंतर चाहते भडकले, अभिनेता बायकोला किस करुन कॉफी पित पोलिसांबरोबर गेला अन्…
‘पुष्पा २’ या महिन्यात ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्याबरोबर रश्मिका मंदाना दिसली होती आणि सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटाला भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटावर नक्की काय परिणाम होणार? याकडेदेखील संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसेच अल्लू अर्जुनच्या करिअरवर याचा काय परिणाम होणार? हेदेखील पाहण्यासारखे आहे.