सध्या देशात सर्वत्र ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची चांगलीच क्रेझ असलेली बघायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या ॲक्शन थ्रिलरच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की आगाऊ बुकिंगमध्येच या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले. हिंदी भाषेतही सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर नाव कोरले. (siddharth on pushpa 2 )
सोशल मीडियावरदेखील या चित्रपटाची चर्चा अधिक सुरु आहे. अशातच आता एका अभिनेत्याने चित्रपटाच्या दर्जाबद्दल भाष्य केले आहे. हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ. सिद्धार्थने पुन्हा एकदा ‘पुष्पा 2’बद्दल भाष्य केले आहे. ज्यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते खूप चिडले आहेत. सिद्धार्थ नुकताच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने ‘पुष्पा 2’ ट्रेलर लॉचदरम्यान जमा झालेल्या गर्दीला जेसीबी म्हणून संबोधलं होतं.
‘फ्री प्रेस जरनल’च्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ म्हणाला की, “आपल्या देशात जेसीबी खणण करताना जी गर्दी जमा होते त्यामुळे बिहारमध्ये अल्लू अर्जुनला बघायला जमा होणे ही काही साधारण गोष्ट नाही. भारतात गर्दी मध्ये दर्जा नाही. जर हे खरं असतं तर सगळे राजकीय पक्ष जिंकायला हवे होते. हे सगळे बिर्याणी व दारुच्या बॉटलसाठी आले होते”.
दरम्यान सिद्धार्थचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटाला चांगले यश मिळत असताना सिद्धार्थने वक्तव्य केले आहे. ‘पुष्पा 2’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत ६७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत डेटा आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकतात. ‘पुष्पा 2’ प्रदर्शित झाल्याचा आनंद प्रेक्षकांनी साजरा केला.