टेलिव्हिजनवरील सगळ्यांचाच लाडका कार्यक्रम अंताक्षरी ३० वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. त्यांच्या सूत्रसंचलनाची चर्चा अजूनही होते. अशातच आता या नुकताच या कार्यक्रमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या लॉचची चर्चा सर्वत्र मोठ्या प्रमाणात रंगली आहे. यावेळी अन्नू यांनी केलेल्या एका कृतीमुळे त्यांचे कौतुक होत आहे. तसेच या प्रकाराची चर्चादेखील रंगली आहे. यावेळी अन्नू यांनी तिथे हजर असलेल्या महिलांचे पाय धुतले. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. (annu kapoor on amitabh bachachan)
या सोहळ्यासाठी अभिनेते गुजरात येथील वडोदरा शहरात पोहोचले होते. त्यांनी हा सोहळा मोठ्या हटके अंदाजात सेलिब्रेट केला आहे. लॉन्चच्या वेळी अन्नू यांनी मंचावर उपस्थित असणाऱ्या मुलींचे पाय धुतले. तसेच तिथे असलेल्या पुरुषांनादेखील संबोधले. सगळ्या पुरुषांनी त्यांच्या आयुष्यातील कोणत्याही तीन महिलांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करावा.
याशिवाय अन्नू यांनी अमिताभ बच्चन व शाहरुख खान यांनादेखील असं करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, “अमिताभ बच्चन यांना सांगा ना जया बच्चन यांचे पाय धुवा. शाहरुखला पण गौरीचे पाय धुवायला सांगा. कोण नाही म्हणतंय?”. अन्नू यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. अन्नू यांनी यावेळी वडोदरामध्ये या शोसाठी कधी ऑडिशन सुरु होणार याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की या शोमध्ये सहा टीम असणार आहेत. तसेच यासाठी १२-१३ डिसेंबर रोजी वडोदरा येथे ऑडिशन होणार आहे. त्यानंतर काही जणांची निवड करण्यात येणार आहे. तसेच १४ डिसेंबर रोजी चार राऊंडमध्ये या २४ सदस्यांची निवड केली जाऊन अंताक्षरी खेळण्यात येणार आहे.
दरम्यान अन्नू यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘लव्ह की अरेंज मॅरेज’, ‘हमरे बाराह’ या चित्रपटांमध्ये दिसून आले होते. विनोदी, गंभीर तसेच प्रत्येक प्रकारच्या भूमिका त्यांनी आजवर साकारल्या आहेत. तसेच त्यांचा एक मोठा चाहतावर्ग असून त्यांच्या चित्रपटांनादेखील अधिक प्रसिद्धी मिळते. तसेच आगामी काळातदेखील त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.