दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’च्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदना, फहाद फासिल यांची मुख्य भूमिका असणारा ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच भेटीला आला होता. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अजूनच वाढली. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटावर बंदी यावी अशी मागणी केली जात आहे. हरियाणामध्ये ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. हे नक्की काय प्रकरण आहे? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (pushpa 2 : the rule movie ban)
‘दैनिक भास्कर’च्या रिपोर्टनुसार, पुष्पा २: द रुल’ चित्रपटाला घेऊन मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. हरियाणातील हिस्सार या गावात चित्रपटाच्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. हिस्सार या गावातील कुलदीप कुमार या व्यक्तीने तक्रार केली आहे. या तक्रारीत चित्रपटामुळे हिंदु भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात आले आहे.
तक्रारीमध्ये कुलदीप यांनी लिहिले कि, “पुष्पा २ : द रुल’ च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन अर्धनारीनटेश्वरच्या रुपात दिसला आहे. यामध्ये कालीमातेचा फोटोदेखील दिसत आहे. कुलदीप यांच्या मते हा सीन धार्मिक असून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत”. तसेच या चित्रपटातील अर्धनारीनटेश्वरच्या वेशातील अल्लू अर्जुनचा सीन काढण्याची मागणी केली आहे. तसेच असे न केल्यास हा चित्रपट हरियाणामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही असेही सांगितले आहे.
दरम्यान ‘पुष्पा २’च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनचा अनोखा आणि हटके अंदाज दाखवण्यात आला आहे. तर ट्रेलरच्या शेवटी ‘पुष्पा १’मधील “फ्लॉवर नहीं फायर है…” या गाजलेल्या डायलॉगला घेऊन पुष्पा २ मध्ये आणखी एक नवीन डायलॉग लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे पुष्पा फायर नाही तर ‘वाईल्ड फायर’ आहे”. एकूणच एकाहून अधिक जबरदस्त डायलॉग, फाईट सीन्सची झलक या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. ट्रेलरच्या शेवटी ‘पुष्पा १’मधील “फ्लॉवर नहीं फायर है…” या गाजलेल्या डायलॉगला घेऊन पुष्पा २ मध्ये आणखी एक नवीन डायलॉग लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे – पुष्पा फायर नाही तर ‘वाईल्ड फायर’ आहे”. एकूणच एकाहून अधिक जबरदस्त डायलॉग, फाईट सीन्सची झलक या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.