Laxmi Niwas New Serial Promo : ‘झी मराठी’ वाहिनी गेली २५ वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. विविध आशयघन मालिका घेऊन येत ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर आहे. ‘झी मराठी’ वाहिनी आणि प्रेक्षकांचे अतूट नाते आहे. इतकंच नाही तर ‘झी मराठी’ वाहिनी नेहमीच कौटुंबिक विषय हाताळत रसिक प्रेक्षकांसाठी मेजवानी घेऊन येत असते. अशातच एका नव्या मालिकेची घोषणा झाल्यापासून साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लक्ष्मी निवास’ ही नवी कोरी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांची उत्सुकता वाढवली. यानंतर आता सर्व कलाकार एकत्र असलेला एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
‘लक्ष्मी निवास’ या मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. लक्ष्मी आणि निवास पाहुण्यांची उठाठेव करण्यात व्यस्त दिसत आहेत. तर आलेले पाहुणे लक्ष्मी निवास यांच्या घराची भरभरुन स्तुती करताना दिसत आहेत. लेकीच्या लग्नाची धावपळ या प्रोमोमध्ये पाहायला मिळत असतानाच अगदी शेवटी निवास यांना जाग येते. तेव्हा लक्ष्मी त्यांना कोणतं स्वप्न पाहिलं याबाबत विचारतात. एका सुंदर घराच्या स्वप्नात हे जोडपं पाहायला मिळतंय.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई होणार सना खान, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज, सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव
“लक्ष्मी श्रीनिवासने पाहिलेली स्वप्न पूर्ण होतील की स्वप्नच रहातील?”, असं कॅप्शन देत हा मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेते तुषार दळवी ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मुलीच्या भूमिकेत पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर व दिव्या पुगांवकर या दोन अभिनेत्री दिसणार आहेत.
आणखी वाचा – प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा २’ अडचणीत, चित्रपटात हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप, ‘तो’ सीन काढणार का?
स्वप्नांची शिदोरी घेऊन आलेलं हे जोडपं त्यांचं घर बांधायचं स्वप्न पूर्ण करणार का?, एकीकडे मुलींची लग्न व स्वतःच टोलेजंग घर अशी दोन स्वप्न ते कधी आणि कशी पूर्ण करतील याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. समोर आलेल्या प्रोमोला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळताना दिसतेय.