गुरूवार, एप्रिल 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा २’ अडचणीत, चित्रपटात हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप, ‘तो’ सीन काढणार का?

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 22, 2024 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
pushpa 2 : the rule movie ban

'पुष्पा २' चित्रपटावर बंदी?

दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’च्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदना, फहाद फासिल यांची मुख्य भूमिका असणारा ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच भेटीला आला होता. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अजूनच वाढली. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटावर बंदी यावी अशी मागणी केली जात आहे. हरियाणामध्ये ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. हे नक्की काय प्रकरण आहे? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (pushpa 2 : the rule movie ban)

‘दैनिक भास्कर’च्या रिपोर्टनुसार, पुष्पा २: द रुल’ चित्रपटाला घेऊन मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. हरियाणातील हिस्सार या गावात चित्रपटाच्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. हिस्सार या गावातील कुलदीप कुमार या व्यक्तीने तक्रार केली आहे. या तक्रारीत चित्रपटामुळे हिंदु भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा – खिशाला परवडणाऱ्या किंमतीत एकापेक्षा एक हटके Readymade ब्लाऊज, अप्रतिम डिझाईनही तयार करुन मिळणार, पाहा Inside Video

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

तक्रारीमध्ये कुलदीप यांनी लिहिले कि, “पुष्पा २ : द रुल’ च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन अर्धनारीनटेश्वरच्या रुपात दिसला आहे.  यामध्ये कालीमातेचा फोटोदेखील दिसत आहे. कुलदीप यांच्या मते हा सीन धार्मिक असून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत”. तसेच या चित्रपटातील अर्धनारीनटेश्वरच्या वेशातील अल्लू अर्जुनचा सीन काढण्याची मागणी केली आहे. तसेच असे न केल्यास हा चित्रपट हरियाणामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही असेही सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या नाटकाला आल्या ९० वर्षांच्या आजी, एक तास प्रवास करुन पोहोचल्या, भावुक क्षण

दरम्यान ‘पुष्पा २’च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनचा अनोखा आणि हटके अंदाज दाखवण्यात आला आहे. तर ट्रेलरच्या शेवटी ‘पुष्पा १’मधील “फ्लॉवर नहीं फायर है…” या गाजलेल्या डायलॉगला घेऊन पुष्पा २ मध्ये आणखी एक नवीन डायलॉग लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे पुष्पा फायर नाही तर ‘वाईल्ड फायर’ आहे”. एकूणच एकाहून अधिक जबरदस्त डायलॉग, फाईट सीन्सची झलक या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. ट्रेलरच्या शेवटी ‘पुष्पा १’मधील “फ्लॉवर नहीं फायर है…” या गाजलेल्या डायलॉगला घेऊन पुष्पा २ मध्ये आणखी एक नवीन डायलॉग लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे – पुष्पा फायर नाही तर ‘वाईल्ड फायर’ आहे”. एकूणच एकाहून अधिक जबरदस्त डायलॉग, फाईट सीन्सची झलक या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

Tags: allu arjunpushpapushpa 2
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aditi Dravid struggle
Entertainment

“मागचं वर्ष मेंटल हेल्थ फेजमध्ये होते”, अदिती द्रविडचा कठीण काळ, म्हणाली, “मी कधी बोलले नाही…”

एप्रिल 9, 2026 | 1:15 pm
Samay Raina on Controversy
Entertainment

“स्वतःच्या मुलाला पायावर उभं का नाही केलं?”, कॉमेडियनचा थेट अमिताभ बच्चनला सवाल, रोस्ट करणं पडणार महागात?

एप्रिल 9, 2026 | 10:40 am
deeksha pawar akanksha choudhary fight
Entertainment

एकमेकींचे कपडे फाडले, मारामारी केली अन्…; लोकप्रिय रिऍलिटी शोमध्ये नेमकं सुरुय काय?, नॅशनल टीव्हीवर हा प्रकार पाहून संताप

एप्रिल 9, 2026 | 9:44 am
Bigg Boss Marathi 6 Sagar Karande
Entertainment

Video : पत्नीकडून औक्षण, केक कटिंग अन्…; ‘बिग बॉस ६’ मधून घरी परतताच सागर कारंडेचं कुटुंबियांकडून कौतुक, भावुक झाला आणि…

एप्रिल 8, 2026 | 5:35 pm
Next Post
Laxmi Niwas New Serial Promo

'लक्ष्मी निवास' या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसला कौटुंबिक जिव्हाळा, हर्षदा खानविलकरांच्या भूमिकेचं कौतुक, प्रेक्षकही भारावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.