शुक्रवार, सप्टेंबर 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिच्यासाठी वेळ…”, १६ वर्षीय लेकीने आत्महत्या केल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, “मीही मेलो आहे अन्…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 22, 2023 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vijay Antony expressed after his daughter Suicide

"तिच्यासाठी वेळ...", १६ वर्षीय लेकीने आत्महत्या केल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, "मीही मेलो आहे अन्..."

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व संगीतकार विजय अँटोनी याची मुलगी मीरा हिने १९ सप्टेंबर रोजी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं होतं. तिच्या जाण्याने अभिनेता व त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. ती अवघ्या १६ वर्षाची होती. तिने आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, मुलीच्या आत्महत्येनंतर विजय अँटोनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. (Vijay Antony expressed after his daughter Suicide)

अभिनेता विजय अँटोनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तो मुलीच्या निधनानंतर भावना व्यक्त करताना भावुक झालेला आहे. विजय या पोस्टमध्ये म्हणाला की, “प्रिय मित्रांनो, माझी मुलगी मीरा खूप प्रेमळ आणि धाडसी होती. ती आता अशा शांत ठिकाणी गेली आहे जिथे जात, धर्म, पैसा, मत्सर, वेदना, गरिबी आणि द्वेष या जगापेक्षा सुंदर आहेत.”

हे देखील वाचा – मुलीचं नाव काय ठेवणार याबाबत राहुल वैद्यचा खुलासा, म्हणाला, “नावं काढली आहेत पण…”

View this post on Instagram

A post shared by Vijay Antony (@vijayantony)

ती माझ्याशी बोलत आहे. मी तिच्यासह मेलो आहे. आता मी तिच्यासाठी वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे. मी तिच्या नावाने चांगल्या गोष्टी करणार असून त्याची सुरुवात ती करणार आहे.”, असं तो या पोस्टमध्ये म्हणाला आहे. त्याच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील कलाकार व चाहते भावुक झाले असून कमेंट्सद्वारे अभिनेत्याला धीर देताना दिसत आहे.

हे देखील वाचा – स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लग्नापूर्वीची आफ्रिका ट्रीप, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मीराने १९ सप्टेंबरला तिच्या चेन्नईतील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ती मानसिक तणावाखाली होती आणि तिच्यावर उपचारदेखील सुरू होते. ती चेन्नईतील एका प्रसिद्ध शाळेत शिकत होती. तिच्या पश्चात वडील विजय अँटनी, आई फातिमा व बहीण लारा असा परिवार असून तिच्या जाण्याने अभिनेत्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Tags: South actor Vijay Antony daughter SuicideVijay AntonyVijay Antony expressed after his daughter Suicide
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Siddharth Chandekar On Mitali Mayekar

Video : बायको पाय घसरून पडताच सिद्धार्थ चांदेकरला हसू अनावर, मजेशीर व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "धसमुसळी बायको…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.