मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर. सिद्धार्थ मिताली कायमच काही ना काही विशेष पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. शिवाय ही जोडी अनेकदा परदेश वारी करताना ही पाहायला मिळते. विविध ठिकाणी सुट्टीचा आनंद घेताना सिद्धार्थ मिताली पाहायला मिळतात. त्यांच्या सुट्टीदरम्यानचे अनेक फोटोज व व्हिडिओज ते सोशल मीडियावरून नेहमीच शेअर करतात. अशातच या जोडीचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Siddharth Chandekar On Mitali Mayekar)
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर ही लाडकी जोडी सध्या दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. यादरम्यानचे अनेक फोटोज ते सोशल मीडियावर शेअर करत आहे. असाच एक व्हिडिओ सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ व मिताली दुबई येथे फोटोशूटला गेले आहेत. आणि फोटोशूटदरम्यान सिद्धार्थची पत्नी मिताली पडली असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
सिद्धार्थ मिताली दुबई येथे मज्जा मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. मज्जा मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरून शेअर देखील केले आहेत. अशातच दुबई येथील ‘डेसर्ट सफारी’ येथे फोटोशूटचा आनंद लुटताना मिताली पाय घसरून पडली, त्यावर सिद्धार्थला हसू अनावर झालं आहे, असा व्हिडीओ सिद्धार्थने पोस्ट केला आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडिओला “Perks of getting to shoot for the धसमुसळी बायको! Very glamorous “.
आणखी वाचा – मुलीचं नाव काय ठेवणार? याबाबत राहुल वैद्यचा खुलासा, म्हणाला, “नावं काढली आहेत पण…”
सिद्धार्थने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थ व मिताली यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली. ही क्युट जोडी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्यांच्या रोमँटिक फोटोशूट्सची नेहमीच चर्चा होत असते. नुकतंच या जोडीने मुंबईमध्ये त्यांच्या हक्काचं घर देखील खरेदी केलं, याची देखील जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली.