गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 19, 2023 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
South actor Vijay Antony daughter Suicide

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन

एकीकडे आज आनंदाचे वातावरण असताना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेता व संगीतकार विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ती १६ वर्षाची होती. तिच्या जाण्याने अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (South actor Vijay Antony daughter Suicide)

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार असं समोर आलं की, अभिनेता विजय अँटोनीची मुलगी मीरा तिच्या चेन्नईतील राहत्या घरात पहाटेच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. या घटनेननंतर तिला त्वरित एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मीरा चेन्नईतील एका प्रसिद्ध शाळेत शिकत होती. दरम्यान, ती गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली असून तिच्यावर उपचारदेखील सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

हे देखील वाचा – अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ‘द केरला स्टोरी’च्या दिग्दर्शकांनी व्यक्त केलं मत, म्हणाले, “चित्रपट न बघताच…”

अभिनेता व संगीतकार असलेला विजय अँटोनी तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखला जातो. अभिनेत्याला फतिमा नावाची पत्नी असून ती स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सांभाळते. या दाम्पत्याला मीरा आणि लारा या दोन मुली असून मुलगी मीराच्या आत्महत्येने अभिनेता व त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

हे देखील वाचा – Video : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या घरी झाले गणरायाचे आगमन, मूर्तीभोवती फुलांच्या सुंदर आरासने वेधले लक्ष

विजय अँटोनी सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. तो लवकरच ‘रथम’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच त्याचा चेन्नईमध्ये एक कार्यक्रम पार पडला, ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. अभिनय व संगीत दिग्दर्शनाबरोबर निर्माता, एडिटर, ऑडिओ इंजिनीअर सारख्या क्षेत्रातही त्याने नाव कमावलं आहे.

Tags: south actorSouth actor Vijay Antony daughter SuicideVijay Antony
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Subodh Bhave On Ganeshotsav

सुबोध भावेच्या लेकांनी गणपतीसाठी बनवला 'चांद्रयान'चा देखावा, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.