गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरु असलेली पाहायला मिळतेय. आज गणरायाचं आगमन झालेलं आहे. सगळेचजण गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज असलेले पाहायला मिळाले. गणरायाच्या स्वागतासाठी सगळेचजण सजावट करण्यात व्यस्त आहेत. अनेकांनी एक एक थीम तयार करून सजावट केलेली पाहायला मिळतेय. अशातच कलाकार मंडळींच्या घरीही गणेशोत्सवाचं आगमन झालेलं पाहायला मिळतंय. अनेकांनी घरी आलेल्या बाप्पाचे फोटोस, व्हिडीओस सोशल मीडियावरून शेअर देखील केले आहेत. (Subodh Bhave On Ganeshotsav)
अशाच एका मराठमोळ्या कलाकाराच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. नुकतेच काही फोटो शेअर करत त्याने एक पोस्ट लिहिली आहे. हा कलाकार म्हणजे अभिनेता सुबोध भावे. सुबोध भावेच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी भावे कुटुंबीय उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. सुबोधने शेअर केलेल्या फोटोंमधील देखाव्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सुबोध भावेच्या मुलांनी मिळून यंदा ‘चांद्रयान ३’ची थीम केली असल्याचं कळतंय. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोची ‘चांद्रयान ३’ मोहीम यंदा फत्ते झाली. ‘चांद्रयान ३’ चं चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग यावर्षी यशस्वी झालं. या यशाचा आनंद साऱ्या भारतीयांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. हाच आनंद सुबोध भावेच्या मुलांनीही साजरा केला. दोघंही ‘चांद्रयान ३’ची थीम तयार केली.
सुबोध भावेने चांद्रयान ३ व त्यांच्या गणेशाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. त्याखाली कॅप्शन देत त्याने म्हटलं आहे की, “गणपती बाप्पा मोरया. यंदाच्या वर्षी आमच्या घरी मुलांनी सादर केलेला देखावा “चांद्रयान 3″. श्री गणेश आपल्या सर्वाना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना.” सुबोधच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत त्याच्या मुलांचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.