दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन अभिनेत्री रश्मिका मंदना यांचा बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा २’ ;लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन वर्षांपूर्वी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागाने खूप लोकप्रियता मिळवली. या चित्रपटाने आजवरचे सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले. मागच्या महिन्यात या चित्रपटाचे ‘पुष्पा राज’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या गाण्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या गाण्याच्या स्टेपदेखील अनेक जणांनी रीलदेखील बनवले. ही स्टेप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Pushpa 2 song bts)
अल्लू अर्जुन व रश्मिकाचे ‘अंगारो’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या २९ जून म्हणजे आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याची घोषणा आज सोशल मीडियाद्वारे करण्यात आली होती. हे गाणं प्रदर्शित होताच लाखों व्हूज मिळाले. हे गाणे श्रेया घोषलने गायले आहे. रकीब आलम यांनी लिहिले आहे. तसेच देवी श्री प्रसाद यांचे संगीत आहे. तसेच BTS व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गाण्यातील कलाकार गाणे शूट करत आहेत. तसेच मनोरंजन क्षेत्रातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.
रश्मिकाने देखील एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, “मी या गाण्यासाठी खूप उत्सुक होते. हे गाणं ऐकून सगळ्यांना आनंद होईल. हे गाणे सगळ्यांचे आहे. हे गाणे तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी आशा आहे”.
या व्हिडीओला प्रेक्षकांची खूप प्रतिक्रिया मिळत असून अनेकांनी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असल्याचे सांगितले आहे. २०२१ साली ‘पुष्पा’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये लाल चंदनाची तस्करी करताना दिसत आहे. तसेच यामध्ये पुष्पराज व श्रीवल्लीची केमेस्ट्री दाखवण्यात आली आहे. यामध्ये कौटुंबिक कलहदेखील दिसून आले होते. तसेच चित्रपटाच्या शेवटी खलनायक शेखावतबरोबर झालेल्या मारमारीने प्रेक्षकांचे अधिक लक्ष वेधले होते. आता दुसऱ्या भागात पुष्पाचे नवीन व रौद्ररुप पाहायला मिळणार आहे.