बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनू कक्करने भावंडांशी कायमचं तोडलं नातं, असं नक्की काय बिनसलं?, एकत्र राहिले पण…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 14, 2025 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sonu kakkar ends relation with neha and tony

सुप्रसिद्ध गायिका सोनू कक्करने भावंडांबरोबर संपवलं नातं कारण...

बी-टाऊनमधील कलाकारांचं नातं, घटस्फोट चर्चेचा विषय ठरतात. काही कलाकार स्वतःहून व्यक्त होत आपल्या खासगी आयुष्याबाबत सांगतात. घटस्फोट हा शब्द तर आता सर्रास ऐकायला येतो. घटस्फोटापर्यंत नाती येऊन थांबतात. पण या सगळ्यांत आता एक नवा शब्द वर डोकावू पाहत आहे. ते म्हणजे Sibling Divorce. ऐकून तुम्हालाही विचित्र वाटलं असेल. पण सुप्रसिद्ध गायिका सोनू कक्कडमुळे हे प्रकरण समोर आलं आहे. सोनूने तिच्या भावंडांबरोबर नातं तोडलं असल्याचं नुकतंच सांगितलं. त्यासंदर्भातील एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. आता भावंडांमध्येही Sibling Divorce होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (sonu kakkar break relation with tony and neha)

सोनू, नेहा, टोनी कक्करचं काय झालं?

सोनू, नेहा व टोनी कक्कर म्हणजे कलाक्षेत्रातील चर्चेत असणारी नावं. या तिन्ही भावंडांनी संगीतक्षेत्रात नाव कमावलं. अगदी सामान्य कुटुंबामधून आलेली ही भावंडं. सतत एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेले दिसले. मात्र सोनूने तिच्या दोन्ही भावंडांबरोबरचं नातं का? संपवलं याबाबत अनेक प्रश्न आहेत. सोनू, नेहा व टोनीमधील घट्ट नातं कित्येकदा प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. बहुदा आता यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सोनूने एक्सवर (ट्वीटर) पोस्ट शेअर केली.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडने वर्षभराने पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा, नावही ठेवलं खूपच खास, पाहा Video

सोनू कक्कडने भावंडांबरोबर नातं का संपवलं?

सोनू म्हणाली, “यापुढे मी टोनी कक्कर व नेहा कक्कर या दोन सुपरस्टार्सची बहीण नाही. हे सांगताना मला खूप दुःख होत आहे. भावनिक दुःख झाल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. आज मी खरंच खूप निराश आहे”. सोनूने केलेली ही पोस्ट वाचून अनेकांना मोठा धक्का बसला. तिन्ही भावंडांमध्ये नक्की काय बिनसलं?, असे काय वाद झाले? याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे. हे सत्य नाहीच असं कित्येकजण सोशल मीडियाद्वारे कमेंट करत सांगत आहेत.

आणखी वाचा – मोठा बंगला, सहा बेडरुम आणि…; असं आयुष्य जगतो फराह खानचा कुक, एकूण संपत्ती आहे…

View this post on Instagram

A post shared by Sonu Kakkar (@sonukakkarofficial)

पीआर स्टंट की आणखी काही?

काही दिवसांपूर्वीच टोनीच्या बर्थडे पार्टीला सोनूने हजेरी लावली होती. इतकंच काय तर होळी पार्टीलाही तिन्ही भावंडं एकत्र होते. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही तिघं एकमेकांना अजूनही फॉलो करतात. या संपूर्ण घटना लक्षात घेता हा पब्लिसिटी स्टंट आहे की काय? असे प्रश्न विचारले जात आहेत.   सोनूने पोस्ट शेअर केल्यानंतर नेहा व टोनीने मौन पाळणंच पसंत केलं आहे. हे प्रकरण नक्की काय?, हा कौटुंबिक वाद कुठून सुरु झाला हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

Tags: bollywood newsentertainment newsSinger and rapper
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Dahavi a actors

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमीमध्ये पोहोचले ‘दहावी अ’चे कलाकार, भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.