बी-टाऊनमधील कलाकारांचं नातं, घटस्फोट चर्चेचा विषय ठरतात. काही कलाकार स्वतःहून व्यक्त होत आपल्या खासगी आयुष्याबाबत सांगतात. घटस्फोट हा शब्द तर आता सर्रास ऐकायला येतो. घटस्फोटापर्यंत नाती येऊन थांबतात. पण या सगळ्यांत आता एक नवा शब्द वर डोकावू पाहत आहे. ते म्हणजे Sibling Divorce. ऐकून तुम्हालाही विचित्र वाटलं असेल. पण सुप्रसिद्ध गायिका सोनू कक्कडमुळे हे प्रकरण समोर आलं आहे. सोनूने तिच्या भावंडांबरोबर नातं तोडलं असल्याचं नुकतंच सांगितलं. त्यासंदर्भातील एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. आता भावंडांमध्येही Sibling Divorce होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (sonu kakkar break relation with tony and neha)
सोनू, नेहा, टोनी कक्करचं काय झालं?
सोनू, नेहा व टोनी कक्कर म्हणजे कलाक्षेत्रातील चर्चेत असणारी नावं. या तिन्ही भावंडांनी संगीतक्षेत्रात नाव कमावलं. अगदी सामान्य कुटुंबामधून आलेली ही भावंडं. सतत एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेले दिसले. मात्र सोनूने तिच्या दोन्ही भावंडांबरोबरचं नातं का? संपवलं याबाबत अनेक प्रश्न आहेत. सोनू, नेहा व टोनीमधील घट्ट नातं कित्येकदा प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. बहुदा आता यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सोनूने एक्सवर (ट्वीटर) पोस्ट शेअर केली.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडने वर्षभराने पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा, नावही ठेवलं खूपच खास, पाहा Video
सोनू कक्कडने भावंडांबरोबर नातं का संपवलं?
सोनू म्हणाली, “यापुढे मी टोनी कक्कर व नेहा कक्कर या दोन सुपरस्टार्सची बहीण नाही. हे सांगताना मला खूप दुःख होत आहे. भावनिक दुःख झाल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. आज मी खरंच खूप निराश आहे”. सोनूने केलेली ही पोस्ट वाचून अनेकांना मोठा धक्का बसला. तिन्ही भावंडांमध्ये नक्की काय बिनसलं?, असे काय वाद झाले? याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे. हे सत्य नाहीच असं कित्येकजण सोशल मीडियाद्वारे कमेंट करत सांगत आहेत.
आणखी वाचा – मोठा बंगला, सहा बेडरुम आणि…; असं आयुष्य जगतो फराह खानचा कुक, एकूण संपत्ती आहे…
पीआर स्टंट की आणखी काही?
काही दिवसांपूर्वीच टोनीच्या बर्थडे पार्टीला सोनूने हजेरी लावली होती. इतकंच काय तर होळी पार्टीलाही तिन्ही भावंडं एकत्र होते. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही तिघं एकमेकांना अजूनही फॉलो करतात. या संपूर्ण घटना लक्षात घेता हा पब्लिसिटी स्टंट आहे की काय? असे प्रश्न विचारले जात आहेत. सोनूने पोस्ट शेअर केल्यानंतर नेहा व टोनीने मौन पाळणंच पसंत केलं आहे. हे प्रकरण नक्की काय?, हा कौटुंबिक वाद कुठून सुरु झाला हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.