गणेशोत्सवाला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणेशोत्सवाची लगबग सध्या सुरु आहे. सर्वच जण लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आतुरलेले आहेत. प्रत्येक माणसाप्रमाणे मराठी मालिका व सिनेसृष्टीतील कलावंत बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वच कलावंतांच्या घरी गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून एकूणच सर्वच कलावंत मोठ्या दिमाखात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेला आहे. (Sonalee Kulkarni Ganeshotsav Video)
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक सोनाली कुलकर्णीच्या घरीसुद्धा गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे. दरवर्षी सोनाली तिच्या भावासह बाप्प्पाची मूर्ती घडवत असते. यंदाच्या वर्षी सुद्धा ती बाप्पाची मूर्ती घडवताना दिसत असून बाप्पाची मूर्ती घडवतानाचा सुंदर व्हिडिओ तिने तिच्या युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे.
सोनाली कुलकर्णी गेली अनेक वर्ष आपल्या भावासह बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती घडवते. यावर्षीसुद्धा तिने बाप्पाची मूर्ती घडवत खास रुप साकारण्याचा प्रयत्न केला आहे. अवघ्या दोनच दिवसांवर गणेशोत्सव आल्याने अभिनेत्रींच्या घरी सजावटीची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, सोनालीने तिच्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर केला असून तिने बाप्पाची मूर्ती घडवण्यासाठी देहूगावची माती आणि घरातील तुळस याचा वापर केला.
हे देखील वाचा – “तू असल्याने जगण्याला…”, रोमँटिक फोटो शेअर करत शशांक केतकरची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, “नाहीतर हसनेही…”
हा व्हिडिओ शेअर करताना सोनाली म्हणते, “यंदा गणेशोत्सव खूप भावनिक आहे आणि यंदाची मूर्ती खूप खास आहे.” तर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनालीने तिच्या आजीची आठवण सांगताना भावुक झाली होती. ती या व्हिडिओमध्ये म्हणते, “मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं मिळून गेल्या पाच वर्षांपासून बाप्पा बनवतो. यंदाचा गणेशोत्सव आमच्यासाठी खूप भावनिक आहे. कारण, माझी आजी यंदा माझ्याबरोबर नाही. गेल्यावर्षी ती आम्हाला सोडून गेल्यामुळे आम्ही गणपती साजरा करू शकलो नव्हतो. त्यामुळे हा गणेशोत्सव आम्ही पहिल्यांदाच तिच्याशिवाय साजरा करत आहोत. परंतु, तिची आठवण कायम आमच्याबरोबर असेल.”
हे देखील वाचा – “तुझी लाज वाटते”, नाचतानाचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “वडील जाऊन महिनाही झाला नाही आणि…”
सोनालीचा यंदाचा बाप्पा विशेष आहे. कारण, तिने बाप्पाची मूर्ती घडवण्यासाठी देहूगावची माती आणि घरातील तुळसचा वापर केला आहे. याचे कारण सांगताना ती म्हणाली, “देहूगावला आमचे आजी-आजोबा राहायचे, त्यामुळे आमच्यावर देहूगावचे अनेक संस्कार आहेत. त्यामुळे यंदा आम्ही देहूगाव आणि आजी-आजोबा यांच्याशी जवळचं नातं असलेली गणरायाची मूर्ती साकारली.”, असे सोनालीने सांगितलं आहे. सोनालीच्या गणेशोत्सव विशेष व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.