शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठमोळ्या गायिकेला मिळाली सचिन तेंडुलकरसमोर गाण्याची संधी, अनुभव शेअर करत म्हणाली, “समोरच्या व्यक्तीचा आदर करणं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 16, 2023 | 3:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sawani Shende On Sachin Tendulkar

मराठमोळ्या गायिकेला मिळाली सचिन तेंडुलकरसमोर गाण्याची संधी, अनुभव शेअर करत म्हणाली, "समोरच्या व्यक्तीचा आदर करणं…"

जगभरात लाखो चाहते असलेल्या सचिन तेंडुलकरचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच आसुसलेले असतात. अशातच नुकतीच एका लोकप्रिय मराठी शास्त्रीय गायिकेला सचिन तेंडुलकरला भेण्याची सुवर्णसंधी मिळाली. कलाप्रेमी असलेल्या सचिन तेंडुलकरसाठी व त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी खासगी मैफिल करण्याची संधी मराठमोळी शास्त्रीय गायिका सावनी शेंडेला मिळाली. दरम्यान आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर करत तिने सचिन तेंडुलकर व अंजली यांच्या स्वभावाबाबतही भाष्य केलं. (Sawani Shende On Sachin Tendulkar)

बेला शेंडेची बहिण लोकप्रिय शास्त्रीय गायिका सावनी शेंडे आहे. सावनी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावरून ती तिच्या कार्यक्रमाबद्दल तसेच कार्यक्रमांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल चाहत्यांना नेहमीच अपडेट्स देत असते. यावेळी तिने सचिन तेंडुलकरबरोबरचा अनुभव शेअर केला आहे.

आणखी वाचा – “तू असल्याने जगण्याला…”, रोमँटिक फोटो शेअर करत शशांक केतकरची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, “नाहीतर हसनेही…”

सावनी शेंडेने सचिन तेंडुलकरबरोबरचे काही फोटो पोस्ट करत लिहिलं, “काल खास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासाठी शास्त्रीय गायन करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. क्रिकेटचा देव माझ्यासमोर बसून शास्त्रीय संगीत ऐकत होता. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नाही आहेत. काय व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं! खूप साधे, नम्र आणि समोरच्याला खूप आदर देणारे. मी शास्त्रीय संगीतातील बारकावे सांगितल्यावर ते ज्या प्रकारे तल्लीन होऊन आणि मन लावून शास्त्रीय गायन ऐकत होते ते खरंच बघण्यासारखं होतं.”

आणखी वाचा – “तुझी लाज वाटते”, नाचतानाचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “वडील जाऊन महिनाही झाला नाही आणि…”

पुढे तिने लिहिलं, “अंजलीदेखील स्वभावाने खूप चांगल्या आहेत… हॅट्स ऑफ. विक्रम आणि निलेश, मला आमंत्रित केल्याबद्दल. धन्यवाद. ही माझ्यासाठी अविस्मरणीय आठवण राहील. कायम माझ्या हृदयाजवळ असेल. कार्यक्रमाचा क्षण अन् क्षण एन्जॉय केल्याबद्दल सचिन व अंजली तुमचे खूप आभार.” सावनीच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं असून त्यावर नेटकरी कमेंट करत आहेत.

Tags: marathi singersachin tedulkarsawani shende
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Madhurani Prabhulkar AKKK

Video : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरने घाटात चालवली गाडी, म्हणाली, "गाडी चालवता येणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.