बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझी लाज वाटते”, नाचतानाचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “वडील जाऊन महिनाही झाला नाही आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 16, 2023 | 3:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankita Lokhande Troll

‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे. काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीला पितृशोक झाला. एक महिन्यापूर्वी म्हणजेच १२ ऑगस्टला अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिल्याच्या निधनानंतर अंकिता व तिच्या कुटुंबियांना धक्का बसला होता. वडिलांबरोबर अंकिताचं खूप घट्ट असं बॉण्डिंग होत. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या वडिलांसंबंधीत पोस्टवर चाहत्यांकडून नेहमी प्रेम मिळायचं. मात्र आता चाहत्यांनी अंकिताच्या एका पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. (Ankita Lokhande Troll)

वडिलांच्या निधनाला एक महिना झाला नाही तोवर अंकिताने एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे अंकिता चांगलीच ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकली आहे. अंकिता लोखंडने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती ‘पिया तोसे नैना लागे रे’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने आकर्षक कॅप्शनही दिलं आहे.

आणखी वाचा – “तू असल्याने जगण्याला…”, रोमँटिक फोटो शेअर करत शशांक केतकरची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, “नाहीतर हसनेही…”

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

“मी खूप दिवसांनी माझ्याच तालावर नाचत आहे. निशू घरी आल्याबद्दल आणि मला हे करायला लावल्याबद्दल तुझे धन्यवाद. या सुंदर परफॉर्मन्सचे दिग्दर्शन निशांत भट्ट याने केले आहे”, असं कॅप्शन देत ठेका धरतानाचा व्हिडीओ अंकिताने इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या पाच वर्षांनंतर रुबीना दिलैक आई होणार, बेबी बंप दाखवत फोटो केला शेअर, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

अंकिताच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी नाराजी दर्शवत तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. तिच्या या व्हिडीओवर एका चाहतीने कमेंट करत “तुझे वडील जाऊन एक महिनाही झालेला नाही आणि तू डान्स करते”, असं म्हटलं आहे. तर आणखी एका चाहतीने “तुझ्या वडिलांच्या निधनानंतर किमान महिनाभर तरी धीर धर”, अशी कमेंट करत अंकिताला धारेवर धरलं आहे. “वडिलांच्या निधनाचा काहीही फरक पडलेला दिसत नाही”, असंही एकाने म्हटले आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने “खरंच तुझी लाज वाटते, तुझे वडील महिन्याभरापूर्वी गेले आणि तू मात्र डान्स करतेस”, अशी कमेंट केली आहे.

Tags: ankita lokhandeankita lokhande jainankita lokhande trollentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
Sonalee Kulkarni Ganeshotsav Video

देहुगावची माती व तुळशीचं पण घेऊन सोनाली कुलकर्णीने घडवली बाप्पाची खास मूर्ती, अभिनेत्री म्हणाली, "आजी-आजोबांशी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.