शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुस्लिम मुलाबरोबर लग्न करणार असल्याचं कळलं अन्…; सोनाक्षी सिन्हानेच केला वडिलांच्या प्रतिक्रियेचा खुलासा, अभिनेत्री म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 19, 2024 | 3:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sonakshi talked about Shatrughan Sinha's reaction when he said that he will marry Zaheer Khan

मुस्लिम मुलाबरोबर लग्न करणार असल्याचं कळलं आणि...; सोनाक्षी सिन्हानेच केला वडिलांच्या प्रतिक्रियेचा खुलासा, अभिनेत्री म्हणाली...

दिग्गज बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. गेले काही दिवस तिच्या लग्नाबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या आणि अखेर ती बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते. मात्र तिच्या लग्णावर तिचे वडील व घरातील इतर कुटुंबीय नाराज असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. अशातच अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले आहे.

एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षीने तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना झहीर इक्बालशी लग्न करण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल सांगितले. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने म्हटलं की, “जेव्हा मी माझ्या वडिलांना झहीर व माझ्याबद्दल सांगितले. तेव्हा मी खूप घाबरले होते. ते कशी प्रतिक्रिया देतील? हे मला माहित नव्हते. तेव्हा मी त्यांना “तुम्हाला माझ्या लग्नाची काळजी वाटत नाही का? कारण तू मला याबद्दल कधीच काही विचारले नाहीस?”

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

यावर त्यांनी असं म्हटलं की, “मी तुझ्या आईला तुला विचारायला सांगितले आहे. मग मी त्यांना सांगितले की, माझ्या आयुष्यात झहीर नावाचा मुलगा आहे. यावर ती म्हणाली की, “हो, मी पण वाचले होते. मुले मोठी झाली आहेत. त्यामुळे माझी बायको राजी झाली तर मी काय करणार?” असं ते म्हणाले. यापुढे अभिनेत्री असं म्हणाली की, “माझे वडील किती शांत आहेत ते  यावेळी मला जाणवले आणि त्यांनी आमच्या नात्याला पाठींबा दिला”.

आणखी वाचा – “पत्नी एकटीच घरी होती अन्…”, ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याने सांगितला चाहत्यांचा भयावह प्रसंग, म्हणाला, “दारुच्या नशेत…”

याच मुलाखतीत तिचा पती झहीरही सोनाक्षीबरोबर सहभागी झाला होता. यावेळी तो असं म्हणाला की, “मी सोनाक्षीच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी घाबरलो होतो, कारण तोपर्यंत मी त्यांच्याशी (शत्रुघ्न सिन्हा) कधीही समोरासमोर बोललो नव्हतो. बोलायला लागताच आम्ही लाखो गोष्टींवर चर्चा करू लागलो आणि आम्ही चांगले मित्र बनलो. मला माहित आहे की, त्यांची प्रतिमा घाबरवणारी आहे. पण ते खूप शांत व सर्वात गोड व्यक्ती आहेत”.

आणखी वाचा – “पैसे मागण्यासाठी लाज सोडून…”, उषा नाडकर्णींचा ‘त्या’ गाजलेल्या चित्रपटाबद्दल व निर्मात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्यादिवशी मी…”

दरम्यान, ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी व झहीरने गेल्या महिन्यात लग्न केले. सोनाक्षीच्या अपार्टमेंटमध्ये हा विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नोंदणी पद्धतीने त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला होता.

Tags: Bollywood entertainment newssonakshi SinhaZaheer Khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
know about amitabh bachchan

जात लपवण्यासाठी आडनांव बदललं अन्…; बच्चन नावामागची खरी गोष्ट आहे तरी काय?, 'बिग बीं'नी स्वतःच केला खुलासा, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.