बॉलिवूड इंडस्ट्रीत एका सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व अभिनेता झहीर इक्बाल यांनी त्यांच्या नात्याला सात वर्ष पूर्ण होताच लग्न केले आहे. काल २३ जून रोजी मुंबईत त्यांच्या लग्नाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान, सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यातील फोटोदेखील समोर आले. या फोटोंमध्ये या नवविवाहित कपलने आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding Reception)
गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या लग्नाबाबत खूप चर्चा सुरु होती. अखेर दोघांनी अधिकृतपणे लग्न करत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. लग्नाच्या रिसेप्शन लूकसाठी सोनाक्षी व झहीरने लाल व पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन केलं होतं. ग्रँड वेडिंग रिसेप्शनमध्ये सोनाक्षी सिन्हाने लाल रंगाची साडी, केसात गजरा, भांगेत सिंदूर आणि हातात चुडा घातलेला दिसत आहे. तर दुसरीकडे झहीर पांढऱ्या रंगाच्या जोधपुरीमध्ये छान दिसत आहे.
यादरम्यान सोनाक्षी व झहीरने रोमँटिक पोजही दिल्या आहेत. सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. सलमान खान, रवीना टंडन, काजोल, रिचा चड्ढा, अनिल कपूर, तब्बू, अली फजल, अदिती राव हैदरी, रेखा, चंकी पांडे, विद्या बालन, आदित्य रॉय कपूर, दिग्गज अभिनेत्री सायरा बानू, हुमा कुरेशी या कलाकारांनी हजेरी लावली होती.
सोशल मीडियावर सोनाक्षीने लग्नाचे फोटो शेअर करत शेअर करत नोंदणी पद्धतीने विवाहसोहळा उरकला असल्याचं सांगितले. बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये सोनाक्षी व झहीर यांची रिसेप्शन पार्टी झाली. एक हजारहून अधिक पाहुण्यांनी यावेळी हजेरी लावली. शिवाय तिने त्यांच्या नात्याला सात वर्ष होताचं लग्न केलं असल्याचंही जाहीर केलं. लग्नानंतर ही जोडी खूपचं खुश असल्याचं दिसलं.