सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडिलांचं लग्नानंतरही सुरु होतं अफेअर, सोनाक्षी सिन्हानेच केला होता खुलासा, म्हणालेली, “त्यांच्या चुकीमुळे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 24, 2024 | 12:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sonakshi sinha on shhatrughna sinha extra marital affiar

वडिलांचं लग्नानंतरही सुरु होतं अफेअर, सोनाक्षी सिन्हानेच केला होता खुलासा, म्हणालेली, “त्यांच्या चुकीमुळे...”

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. खूप कालावधीपासून असणाऱ्या बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर ती लग्नबंधनात अडकली. सोनाक्षीच्या लग्नावरुन मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. सोनाक्षी हिंदू व जहीर मुसलमान असल्याने दोघांच्याही लग्नामध्ये खूप अडथळे आले होते. सोनाक्षीच्या घरचेदेखील तिच्या लग्नासाठी तयार नव्हते अशीदेखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. मात्र तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी असे काहीही नसल्याचे सांगितले होते. सोनाक्षी ज्यामध्ये खुश आहे त्याला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर सोनाक्षी व जहीर यांचे लग्न थाटामाटात पार पडले. पण या लग्नामुळे सोनाक्षीच्या वडिलांच्या प्रेमकहाणीची चर्चादेखील ऐकायला मिळाली. (sonakshi sinha on shhatrughna sinha extra marital affair)

शत्रुघ्न यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.  चित्रपटात काम करत असताना त्यांचे नाव अभिनेत्री रिना रॉय यांच्याबरोबर अनेकदा जोडले गेले. ते रिना यांच्यावर प्रेम करत असत. मात्र त्याचवेळी शत्रुघ्न यांची ओळख पुनम सिन्हा यांच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शत्रुघ्न व पुनम यांनी लग्नदेखील केले. मात्र ते पुन्हा एकदा रिना यांच्याकडे गेले. त्यांच्या विवाहबाह्य संबंधावरही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. यावर सोनाक्षीनेही भाष्य केले होते.

आणखी वाचा – आईची साडी, दागिने अन्…; सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील खास लूकची चर्चा, अवाढव्य खर्च न करता साधेपणाने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

काही काळापूर्वी सोनाक्षीने एका मुलाखतीमध्ये शत्रुघ्न यांच्या विवाहबाह्य संबंधावर भाष्य करत म्हणाली की, “हे सगळं तेव्हा झालं होतं जेव्हा माझा जन्मदेखील झाला नव्हता. मी जेव्हा मोठी झाले तेव्हापासून मला सगळं समजायला लागलं. पण मी माझ्या वडिलांच्या खूप वर्षांपूर्वी झालेल्या चुकीमुळे मी सुळावर नाही चढवू शकत. त्यांचा तो भूतकाळ होता. त्यामुळे मी यावर जास्त लक्षही देत नाही आणि विचारदेखील करत नाही. काही लोकांसाठी हे केवळ एका हेडलाइनसाठी असेल मात्र माझं ही कुटुंब आहे”.

आणखी वाचा – हरीशची फसवणूक केल्याने दिशा-दामिनी सापडणार आदित्यच्या तावडीत?, अहिल्यादेवींसमोर ऍडशूटचं सत्य येणार का?

सोनाक्षी जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आली होती. त्यावेळी तिचा चेहरा रिना यांच्याशी साधर्म्य  साधणारा  होता. यावरुनही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मात्र ती आईसारखी दिसत असल्याचे सोनाक्षीने स्पष्ट केले होते.

Tags: bollywoodextra marital affairReena royshatrugha sinhasonakshi Sinha
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Aai Kuthe Kay karte Serial

आप्पांच्या नकळत अनिरुद्धने राहतं घर नावावर केलं अन्…; अरुंधतीसमोर आणखी एक नवं आव्हान, कसं पार करणार हे संकट?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.