सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आप्पांच्या नकळत अनिरुद्धने राहतं घर नावावर केलं अन्…; अरुंधतीसमोर आणखी एक नवं आव्हान, कसं पार करणार हे संकट?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 24, 2024 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay karte Serial

आप्पांच्या नकळत अनिरुद्धने राहतं घर नावावर केलं अन्…; अरुंधतीसमोर आणखी एक नवं आव्हान, कसं पार करणार हे संकट?

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळणं येत असतानाच मालिकेत अनिरुद्ध व संजनामुळे कांचनच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलेलं पाहायला मिळालं. संजनाच्या सततच्या टोकाच्या बोलण्याने कांचनच्या छातीत दुखू लागत आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात येतं. आप्पांनी या सगळ्याचा दोष अनिरुद्ध व संजनावर लावलेला पाहायला मिळाला. त्यावेळेला संजनाने याचा बदला घ्यायचं ठरवलं आणि अनिरुद्धच्या मनात विष पेरत हे घर आपल्या नावावर करुन घे असं सांगितलेलं असतं. दरम्यान मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेच्या या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, देशमुखांच्या घरी आनंदाचे वातावरण असतं. (Aai Kuthe Kay karte Serial)

सगळेचजण आप्पांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करत असतात. आप्पांच्या वाढदिवसासाठी सगळेच कुटुंब एकत्र जमलेले असते मात्र त्यात अनिरुद्ध व संजना नसतात. आप्पांचा वाढदिवस साजरा करणार इतक्यातच अनिरुद्ध व संजना घरात येतात. आणि आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. अनिरुद्ध आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर संजना म्हणते तुम्ही सुद्धा आम्हाला शुभेच्छा द्या. यावर अरुंधती विचारते तुम्हाला कोणत्या शुभेच्छा द्यायच्या आहेत?, तेव्हा संजना सांगते की, आता हे घर अनिरुद्धच्या नावावर झालं आहे. यावर अरुंधतीचा पारा चढतो.

आणखी वाचा – आईची साडी, दागिने अन्…; सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील खास लूकची चर्चा, अवाढव्य खर्च न करता साधेपणाने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अरुंधती म्हणते की तुम्ही आप्पांना फसवून हे घर तुमच्या नावावर केलं आहे का?. यावर अनिरुद्ध हो असं सांगतो. आणि माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता त्यामुळे मला हे असं करावं लागलं आणि माझा तो हक्क आहे, असंही बोलतो. इतकंच असेल तर तू एका महिन्याच्या आत माझे सगळे पैसे दे. मग मी हे घर खाली करतो असं सांगतो. आता अरुंधती समोर खूप मोठं आव्हान आलेलं असतं. अरुंधतीने न घाबरता देशमुख कुटुंबाच्या भल्यासाठी हे आव्हान स्वीकारते.

आणखी वाचा – आधी रुसवा, आता शत्रुघ्न सिन्हांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या लग्नानंतर म्हणाले, “झहीरबरोबर ती…”

अरुंधती म्हणते की, मी तुम्हाला एका महिन्याच्या आत पैसे दिले. तर तुम्हाला हे घर कायमचं सोडावं लागेल आणि या घराच्या आसपासही तुम्ही मला फिरताना दिसता कामा नये. आता अरुंधतीने स्वीकारलेलं एका महिन्याचे हे आव्हान ती पूर्ण करु शकेल का?, अनिरुद्धला ती पैसे देऊ शकेल का?, हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.

Tags: aai kuthe kay karteAai Kuthe Kay karte Serialmarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding Reception

ना महागडा लेहंगा, ना अवाढव्य खर्च; सोनाक्षी सिन्हाच्या ग्रँड रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची गर्दी, कार्यक्रमात नक्की काय काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.