रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात अरमान मलिकचा त्याच्या दोन बायकांसह प्रवेश, सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “‘बिग बॉस’ला झालंय काय?”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 24, 2024 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
devoleena bhattacharjee on youtuber armaan malik

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात अरमान मलिकचा त्याच्या दोन बायकांसह प्रवेश, सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “‘बिग बॉस’ला झालंय काय?”

‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून चांगलेच चर्चेत आले आहे. यामध्ये अनेक सदस्य असे आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली होती. यावेळी तिसऱ्या पर्वामध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर, कलाकार, युट्यूबर यांचा समावेश आहे. काही सदस्यांमुळे नाराजीदेखील आहे. दिल्लीतील प्रसिद्ध ‘वडापाव गर्ल’च्या सहभागाने अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने  संताप व्यक्त केला होता. अशातच आता पुन्हा एकदा देवोलीनाने युट्यूबर अरमान मलिकबद्दल भाष्य केले आहे. अरमान त्याच्या  दोन्ही पत्नींबरोबर सहभागी झाला आहे. शोच्या पहिल्या दिवशी अरमान व त्यांच्या बायकांना प्रेम कहाणी विचारली होती. (devoleena bhattacharjee on youtuber armaan malik)

अरमान, पायल व कृतिका यांनी त्यांची प्रेमकहाणी टेलिव्हिजनवर सांगितली होती. हा व्हिडीओ देवोलीनाने शेअर करत भाष्य केले आहे. तिने सोशल मीडियावर लिहिले आहे की, “हे मनोरंजन आहे असं तुम्हाला वाटतं का? हे मनोरंजन नाही घाण आहे. याकडे दुर्लक्ष करु नका. हे रील नाही खरं आहे. मला हे समजत नाही की इतक्या निर्लज्जपणे याला मनोरंजन कसे बोलू शकता. मला हे सगळं ऐकून खूप घाण वाटत आहे. केवळ सहा-सात दिवसांत प्रेम, लग्न झालं तसंच तिच्या मैत्रिणीबरोबरही झालं. हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचं आहे”.

आणखी वाचा – “आता इंग्रजी गाणी का गाते?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर केतकी माटेगावकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “मराठी गाणी…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे ती म्हणाली की, “आणि बिग बॉस तुम्हाला काय झालंय? तुमचे इतके वाईट दिवस आले आहेत का की ज्यांनी एकापेक्षा अधिक लग्न केली आहेत त्यांना कार्यक्रमात घ्यावे लागले. एकापेक्षा अधिक लग्न करु शकतात आणि एकत्र खूप गुण्यागोविंदाने राहू शकतात असे नवीन पिढीला सांगायचे आहे का?”, देवोलीनाप्रमाणानेच इतर लोकही अरमानवर भडकले आहेत. तसेच त्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील करत आहेत.

आणखी वाचा – आईची साडी, दागिने अन्…; सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील खास लूकची चर्चा, अवाढव्य खर्च न करता साधेपणाने वेधलं लक्ष

दरम्यान देवोलीनाच्या स्टोरीवरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. तसेच बिगबॉस ओटीटीवरही मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. देवोलीनादेखील टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’मध्ये दिसून आले होती. ते पर्वदेखील देवोलीनाने खूप गाजवलं होतं.

Tags: Armaan malikbig bossDevoleena Bhattacharjee
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss OTT 3

'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी झाले १६ स्पर्धक, कोणाला मिळतात सर्वाधिक पैसे, एकाचं मानधन आहे तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.