सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी व उर्फी जावेद लग्न करणार?, स्वतःच म्हणाला, “मी लग्नाला तयार पण…” हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतो. बॉलीवूड सेलेब्रिटींपासून जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या मुलांबरोबर त्याचा खूप चांगला बॉंड पहायाल मिळतो. गेल्या काही दिवसांपासून ऑरी व उर्फी अनेकदा एकत्रित पाहायला मिळतात. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चा सर्वत्र झाल्या. मात्र त्यांनी प्रत्येकवेळी माध्यमांना उत्तर देणं टाळलं. अशातच आता दोघांनीही माध्यमांसमोर भाष्य केले आहे. यावरुन पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. (orry and uorfi on wedding)
ओरी व उर्फी हे दोघेही त्यांच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखले जातात. उर्फी तिच्या कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करुन काहीतरी नवीन तयार करताना दिसते. तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात येते. मात्र ती या सर्व प्रतिक्रियांना टाळून तिचे काम सुरु ठेवले आहे. तसेच ओरीदेखील नेहमी मोठमोठ्या कलाकारांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतो. तसेच त्याच्या मोबाईलच्या विशिष्ट कव्हरमुळेही चर्चेत असतो. अशातच आता दोघांचाही एक नवीन व्हीडीओ समोर आला आहे. यामध्ये दोघंही पापाराझीबरोबर बोलताना दिसत आहे. यादरम्यान पापाराजीनी दोघांना लग्नाबद्दल प्रश्न विचारला.
मध्यामांसमोर येताच त्यांना “लग्न करणार का?”, असा प्रश्न विचारला. त्यावर ओरीने उत्तर दिले की, “का नाही करणार? तिला लग्न करायचे असेल तर मी का नाही करणार?”, असे उत्तर देताच आता मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. हा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्नाबद्दल उर्फीला देखील अनेकदा प्रश्न विचारले गेले. मात्र तिने यावर कधीही ठामपणे उत्तर दिले नाही.
दरम्यान ओरीने लग्नाच्या विषयावर जे उत्तर दिले ते गंभीर नसल्याचेही बोलले गेले आहे. मात्र त्यानंतर उर्फीने ही पापाराझीना उत्तर देत सांगितले की, “तुम्हाला आमच्या लग्नाची खूप घाई आहे”. त्यावर पापाराझी म्हणाले की, “ओरीने लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यावर उर्फी म्हणाली की, “पण त्याने कोणाचेही नाव नाही घेतले”.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल होताच नेटकऱ्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “माहीत नाही का, पण दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत”. दुसऱ्या एका नेटकाऱ्याने लिहिले की, “आज समजले की खरच देवाने प्रत्येकासाठी कोणी ना कोणी बनवले आहेच”. ओरी व उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.