शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात जुने स्पर्धक सहभागी होणार?, कलाकारांच्या पोस्टमुळे चर्चा, उत्सुकता शिगेला

Saurabh Moreby Saurabh More
जून 15, 2024 | 1:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg boss marathi ex-contestant Kiran Mane and Utkarsha Shinde shared post about bigg boss season five

'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वात जुने स्पर्धक सहभागी होणार?, कलाकारांच्या पोस्टमुळे चर्चा, उत्सुकता शिगेला

टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस’चे नाव घेतले जाते. प्रेक्षक हिंदी ‘बिग बॉस’सह ‘बिग बॉस’ मराठीदेखील तितक्याच आवडीनं पाहतात. त्यामुळे ‘बिग बॉस’ मराठीचा पाचवा सीझन कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या सीझनची घोषणा करण्यात आली. एका खास प्रोमोद्वारे ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळी महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख शो होस्ट करणार असल्याचेही समोर आले.

‘बिग बॉस’च्या नव्या होस्टची घोषणा होताच ‘बिग बॉस’च्या माजी स्पर्धकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अभिनेते किरण माने यांनी खास पोस्ट शेअर केली होती. यावेळी “रितेशभाऊ, ‘बिग बॉस’ मराठी सिझन फोरमध्ये पहिल्यांदा पाहुणा म्हणून आलास तेव्हा ‘बिग बॉस’ने तुझ्या स्वागताची जबाबदारी माझ्यावर दिली होती. आता तू होस्ट म्हणून येतो आहेस हे कळल्यावर खूप आनंद वाटला. ‘बिग बॉस’ या खेळाची जाण असलेला, बायस्ड नसलेला, बॅलन्स्ड-कंपोज्ड होस्ट ‘बिग बॉस’ मराठीला गरजेचा होता. तुझा स्वभाव पहाता, तो तुझ्या रूपानं मिळाला असं वाटतं” असं म्हणाले होते.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

आणखी वाचा – संकर्षण कऱ्हाडेच्या ‘या’ नाटकाला नाट्यपरिषदेचे तीन पुरस्कार, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “अनेक प्रयोग…”

अशातच आता किरण मानेंनी नुकतीच शेअर केलेली एक पोस्टही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. किरण मानेंनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे बिग बॉस मराठीच्या आगामी सीझनबद्दल म्हणजेच बिग बॉस मराठीच्याअ पाचव्या सीझनबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण मानेंनी रितेश देशमुखच्या कटआऊट असलेल्या फोटोशेजारी उभा राहून फोटो काढला आहे. तसेच या पोस्टद्वारे किरण मानेंनी “काहीतरी शिजतंय” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – देवीआई भक्तांच्या हाकेला धावली, अस्तिकट्यार मिळवण्यात त्रिनयना देवीच्या लेकींना यश, आता तरी विरोचकाचा वध होणार का?

त्यामुळे आता किरण मानेंचा ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनशी काही संबंध आहे का? ते या शोमध्ये पुन्हा एंट्री करणार आहेत का? की ते या शोमध्ये होस्ट म्हणून सहभागी होणार का? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत. त्यामुळे किरण मानेंच्या या पोस्टचा ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या सीझनशी नेमका काय संबंध आहे? त्यांनी ही पोस्ट कशासंदर्भात केली आहे? हे येत्या काळात पाहायला मिळेल.         

Tags: bigg boss marathikiran manemarathi entertainment newsutkarsh shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
नवऱ्याने सामान फेकून देईन अशी धमकी दिल्यांनतर दलजित कौर स्पष्टच बोलली, म्हणाली, "माझा जन्म…"

नवऱ्याने सामान फेकून देईन अशी धमकी दिल्यांनतर दलजित कौर स्पष्टच बोलली, म्हणाली, "माझा जन्म…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.