प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये २९ जानेवारीला पहाटे १.३० वाजता गालबोट लावणारी घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविक संगमाकडे जात असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. तर ९० जण जखमी झाले आहेत. या घटनेवर बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं. यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं की, “देशात दररोज अनेक लोक मरत आहेत, काही औषधांशिवाय, काही आरोग्य सेवेशिवाय तर काही हृदयविकाराच्या झटक्याने”. बाबा पुढे म्हणाले की, प्रत्येकाला एके दिवशी मरायचे आहे. पण जर कोणी गंगेच्या काठावर मरण पावला तर तो मरणार नाही तर मोक्ष प्राप्त करेल. (Utkarsh Shinde on Mahakumbh stampede Bageshwar Baba statement)
बाबा बागेश्वर यांनी यावर भर दिला आणि सांगितले की, ज्यांचे अकाली निधन झाले त्यांच्याबद्दल त्यांना दुःख आहे, परंतु त्यांना मोक्ष मिळाला आहे. बाबांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यावर काही लोक प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही धार्मिक दृष्टिकोनातून याला योग्य मानत आहेत. अशातच यावर ‘बिग बॉस मराठी’ फेम सुप्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदेने उपरोधिक भाष्य केलं आहे. उत्कर्षने सोशल मीडियावर कविता पोस्ट करत याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे आणि त्याची ही कविता व्हायरल होत आहे.
वीआईपी से जाते तुम – घंटों भीड़ में चलते हम
गंगाजी की कुछ बूंदो पर हक्क हमारा भी है ना
ठीक है साहब आप सरकार हो ना. हम तो गरीब जनता हैं ना.
सर पर लिए अपना सामान – हाथ मैं धर कर लाये जान
सोच रहे थे योग मिलेगा लाभ मिलेगा – स्नान करेंगे भाग खुलेगा
क्या पता था घर का बच्चा कुचल कुचलकर आज मरेगा
किस का मरा बाप, किसी की माँ देख ये दिल जला है
कई मरे कुतों की मौत – और आप कहे उन्हें मोक्ष मिला है
आपने बोला १५ मरे है – सब सच्च जनता जानगई
आंखो देखा देखने वाले बोले हजारो की है जानगई
फिल्मो में हमने देखा था कुंभ में लोग बिछड़ते है
ये पर कैसा बिछड़ना है जहां – सामने अपने मरते है
मृत्तक की लाशे नहीं मिलती यहां लोग ढूँढते रहजाते है
गंगा भी न धो पायेगी ऐसा मैल ये रखते है
इनका गर कोई मर जाये क्या तब ये सब ये कह सकते हैं?
गरीब मरा तमाशा बनाया -ना लाश मिली ना उतर पाया?
आणखी वाचा – “फक्त प्रसिद्धीसाठी आमचा वापर”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, “खूप दुर्दैवी…”
दिल से यही दुआ है मेरी कर्म का फल सामने आये
ऐसी मौत आपभी देखो मोक्ष आपको मिल जाए
मार दिया है तुमने इनको, लाशे इनकी दोगे ना?
लावारिस से मरतो गए है, घर शव वापस भेजोगे ना?
इतना पुण्य तो कर ही देन, इतनी भीख तो दे ही देना
बाक़ी आप तो सरकार हैं, हम तो गरीब जनता हैं
दरम्यान, बुधवारी पहाटे झालेल्या महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेश सरकारने गर्दीचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी नवा नियम बनवला आहे. सरकारने वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत, व्हीआयपी पासेस रद्द केले आहेत, सुरक्षा वाढवली आहे. प्रयागराजमध्ये बाहेरून येणाऱ्या चारचाकी आणि बसेसच्या प्रवेशावर ४ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या घटनेनंतर चेंगराचेंगरीचे कारण शोधण्यासाठी तीन सदस्यीय न्यायिक समिती स्थापन करण्यात आली होती.