रितेश आणि जिनिलीया देशमुख ही जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. रितेशला प्रत्येक गोष्टीत जिनिलीयाने खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या या लग्नाला जवळपास १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असते. हे दोघे सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. अशातच आज दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने रितेशसाठी रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे. (Genelia shared romantic photo with Riteish)
जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो पोस्ट केला आहे आणि याद्वारे तिने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून जिनिलीयाने असं म्हटलं आहे की, “कबुलीजबाब: मी सहसा सर्व गोष्टीचे नियोजन करते. पण या नियोजनात एक आश्चर्यकारक अपवाद आहे तो म्हणजे तू रितेश (माझ्या आयुष्यातील एकमेव गोष्ट जी मी कधीही नियोजित केलेली नाही. नवीन प्रेम चमकदार असते. खरे प्रेम म्हणजे फटाक्यांसारखे असते. पण आमचे प्रेम हे माझे आवडते आणि सर्व काही आहे”.
आणखी वाचा – “फक्त प्रसिद्धीसाठी आमचा वापर”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, “खूप दुर्दैवी…”
यापुढे जिनिलीयाने असं म्हटलं की, “माझा गुन्हेगारी मधला भागीदार, माझे कायमचे घर. माझे हसणे, माझा आनंद आणि माझ्या जिवंत असण्याचे कारण. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”. दरम्यान, रितेशने २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप झाला, पण या चित्रपटामुळे त्याला त्याची आयुष्यभराची जीवनसाथी मिळाली. ती म्हणजे जिनिलीया डिसूझा. रितेश आणि जिनिलीया डिसूझा हे बॉलिवूडचे आदर्श जोडपे म्हणून ओळखले जातात.
रितेश व जिनिलीया यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये लग्न केले. रितेश आणि जिनिलीया यांना रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत. त्यांच्या या सुखी संसाराला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यानंतर आता लवकरच त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट येणार आहे.