सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदूस्थान बघायचा…”, सचिन तेंडुलकरांची भेट होताच संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “ज्या हातांनी १०० शतकं केली…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 3, 2025 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade emotional after meeting Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकरांना भेटल्यानंतर मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने भावुक, पोस्ट व्हायरल

आपल्या देवाला बघण्याची आणि भेटण्याची सर्वांचीच इच्छा असते. अशीच क्रिकेटच्याही देवाला भेटण्याची अनेकांची इच्छा असते. अर्थात क्रिकेटचा देव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिन यांना बघण्याची आणि भेटण्याचे अनेकांचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. एका मराठी अभिनेत्याची हीच इच्छा पूर्ण झाली आहे आणि हा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. अशातच त्याने शेअर केलेला एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबरचा खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Sankarshan Karhade emotional after meeting Sachin Tendulkar)

या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “काय बोलायचं? फक्तं अनुभवायचं. पुण्यात “चितळे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करायची संधी मिळाली. पाहुणा कोण होता? साक्षात ‘क्रिकेटचा देsssव’. भारतरत्नं सचिन तेंडूलकर. ५ मिनिटं शांतपणे बोलता आलं. ज्या हातांनी १०० शतकं केली तो हातात घेता आला. जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आला. ‘भारतरत्नं’ असलेल्या ‘सचिन’सोबत २ तास मंचावरती ऊभं राहाता आलं. ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदूस्थान बघायचा त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली. माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अनेकांच्या मनात आहेत त्या सांगता आल्या अजुन काय पाहिजे? आकाशातल्या देवाsss आभार. तू जमिनीवरचा देव दावला”.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – “मला अजिबात लाज किंवा खेद नाही”, Lip Kiss व्हिडीओबद्दल उदित नारायण यांचं स्पष्ट मत, म्हणाले, “भारतरत्न मिळवायचा आहे आणि…”

संकर्षणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि या पोस्टला अनेकांनी लाईकस आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, समीर चौघुले यांसारख्या अनेकांनी संकर्षणच्या पोस्टवर कमेंट करत त्याचे कौतुक केलं आहे. दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम, गुणी व चतुरस्त्र कलाकार म्हणून  संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, उत्तम निवेदक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम परीक्षक व एक उत्तम माणूस म्हणून तो चांगलाच लोकप्रिय आहे.

आणखी वाचा – 03 February Horoscope : वृषभ, सिंह राशीसह या राशींसाठी सोमवार असेल शुभ, तुमच्यासाठी कसा असणार दिवस? जाणून घ्या…

संकर्षणच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे आणि त्याच्या कवितांचे अनेक चाहते आहेत. विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. तसंच त्याच्या कामानिमित्तची काही माहितीही शेअर करत असतो. अशातच त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे

Tags: sachin tendulkarsankarshan karhadeSankarshan Karhade emotional after meeting Sachin Tendulkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Mamta Kulkarni On Ramdev Baba

"रामदेव महाकालला थोडंतरी घाबर", ममता कुलकर्णी यांच मोठं भाष्य, धीरेंद्र शास्त्रीलाही सुनावलं, म्हणाल्या, "त्याच्या वयाइतके…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.