राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी गायिका सावनी रवींद्र ही तिच्या सुमधुर आवाजामुळे कायमचं चर्चेत असते. सावनी तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गाण्यांद्वारे रसिक श्रोत्यांच्या संपर्कात राहत असते. त्याचबरोबर ती कधी तिचे तर कधी तिची मुलगी शार्वीचे क्यूट फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर करत असते. नुकताच तिने शार्वीचा दिवाळीनिमित्त एक खास व्हिडीओ सोशल मिडियावरून शेअर केला आहे. यात शार्वीचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे. (Singer Savaniee Ravindra Shared Video Of He Daughter)
सावनीचा नवरा डॉ. आशिष धांडे याने शेअर केलेल्या या व्हिडीओत शार्वी व तो स्वत: दिवाळीनिमित्त किल्ला बनवत आहेत. या किल्ल्याला त्यांनी ‘संगीतदुर्ग’ असे नावदेखील दिले आहे. आशिषने हा व्हिडीओ शेअर करत असे म्हटले आहे की, “प्रिय शार्वीबरोबर संगीतदुर्ग किल्ला बनवताना खूप मज्जा आली”. त्याचबरोबर त्याने “शार्वीला नेहमीच चिखलात खेळायला खूप आवडते. लहान मावळ्यांना, प्राण्यांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तिच्या किल्ल्यावर ठेवायला खूप आवडतं”. असेदेखील म्हटले आहे.
हा व्हिडीओ शेअर करत आशिषने पत्नी सावनीचे आभारदेखील मानले आहेत. तिचे आभार मानत त्याने “आमचे अप्रतिम फोटो व व्हिडिओ काढल्याबद्दल तसेच नेहमीप्रमाणेच आमची गुरू राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद” असे म्हटले आहे. या व्हिडीओखाली स्वत: सावनीने ‘माय ‘स्वीटहार्टस’ अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर गायक अभय जोधपुरकरने ‘कित्ती गोड’ असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर सावनीच्या अनेक चाहत्यांनीदेखील या व्हिडीओखाली प्रतिक्रिया देत त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
आणखी वाचा – चुकीच्या पद्धतीने मला हात लावला अन्…; सुरभी भावेने सांगितला मन सुन्न करणारा अनुभव, म्हणाली, “तो रोज येऊन…”
दरम्यान सावनी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या प्रत्येक गाण्यामुळे कायमच चर्चेतदेखील असते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील गाण्यामुळे सावनी चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा या व्हिडीओमुळे सावनी व तिच्या मुलीची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे