शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुग्धा-प्रथमेशच्या लग्नामध्ये रोहित राऊत आणि त्याच्या बायकोचीच हवा, ड्रेसिंग स्टाइलने वेधलं लक्ष, म्हणाले, “आमची माऊ…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2023 | 12:52 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
singer rohit raut juilee joglekar attended mugdha vaishampayan and prathamesh laghate wedding

मुग्धा-प्रथमेशच्या लग्नामध्ये रोहित राऊत आणि त्याच्या बायकोचीच हवा, ड्रेसिंग स्टाइलने वेधलं लक्ष, म्हणाले, "आमची माऊ…"

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी कलाविश्वातील एक जोडी खूपच चर्चेत आहे आणि ही जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. गेले काही दिवस ही जोडी त्यांच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर गेले काही दिवस ते त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत होते. हळदी, ग्रहमखचे काही खास क्षण त्यांनी चाहत्यांवरोबर शेअर केले होते. अशातच ही जोडी काल (२१ डिसेंबर) रोजी विवाहबंधनात अडकली. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून स्पर्धक म्हणून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अखेर एकेमकांचे जोडीदार होण्यापर्यंत पार पडला. अशातच त्यांच्या लग्नाला या शोमधील इतर स्पर्धक व त्यांच्या मित्रपरिवारानेदेखील हजेरी लावली होती. (Juilee Joglekar And Rohit Raut On Instagram)

गायक रोहित राऊत व गायिका जुईली जोगळेकर यांनी मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. ‘सारेगमप’मधील कलाकारांच्या उपस्थितीमुळे या लग्नाला आणखीणच रंगत आली. रोहित-जुईली यांच्याबरोबरच गायिका शमिका भिडे, कार्तिकी गायकवाड व अवंती पटेल यांनीही खास हजेरी लावली होती. कार्तिकी, रोहित, जुईली व शमिका हे मुग्धा व प्रथमेश हे ‘सारेगमप’ कार्यक्रमापासून एकमेकांबरोबर आहेत. या कार्यक्रमानंतर त्यांनी एकत्र अनेक कार्यक्रमदेखील केले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील ही मैत्री अगदी खास आहे.

View this post on Instagram

A post shared by Juilee Joglekar (@juilee.sangeet)

आणखी वाचा – “माझा हा पहिलाच पुरस्कार पण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरची इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट, म्हणाली, “हा क्षण गमावल्याबद्दल…

मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नात रोहित-जुईली यांनी खूपच धमाल केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या लग्नात रोहितने पिवळ्या रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. तर जुईलीने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यांच्या लग्नानिमित्त रोहित-जुईलीने खूपच मज्जा-मस्ती केल्याचे पाहायला मिळाले. जुईलीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये मुग्धा-प्रथमेश यांची खास रांगोळी काढण्यात आल्याचेदेखील पहायला मिळाले

आणखी वाचा – शाहरुख खानचा ‘डंकी’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, रेकॉर्डब्रेक कमाई करणार, एका दिवसातच कमावले तब्बल…

दरम्यान, मुग्धा-प्रथमेशच्या लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी लग्नात मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली असून त्यावर साजेसे दागिने परिधान केले होते. तर प्रथमेशने लाल रंगाचा धोतर, सदरा, त्यावर पिवळ्या रंगाचा शेला व डोक्यावर पगडी असलेला पेशवाई लूक केला होता. मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नातील या खास पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.         

Tags: mugdha prathameshmugdha vaishampayanmugdha vaishampayan and prathamesh laghateMugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Marriage Marathi NewsMugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding Marathi Newsprathamesh laghate
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
shrenu parikh and akshay mhatre wedding

नाकात नथ, नऊवारी पैठणी अन्…; हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरची सून, शाही विवाहसोहळ्याने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.