रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नाकात नथ, नऊवारी पैठणी अन्…; हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरची सून, शाही विवाहसोहळ्याने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 22, 2023 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
shrenu parikh and akshay mhatre wedding

नाकात नथ, नऊवारी पैठणी अन्…; हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरची सून, शाही विवाहसोहळ्याने वेधलं लक्ष

सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत असताना एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडीदेखील नुकतीच बोहोल्यावर चढली आहे. ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री श्रेनू पारीख हिचा नुकताच विवाहसोहळा उरकला आहे. श्रेनूने २१ डिसेंबर २०२३ रोजी लगीनगाठ बांधली आहे. श्रेणूने मराठमोळ्या अक्षय म्हात्रेबरोबर लग्न केले. (shrenu parikh and akshay mhatre wedding)

श्रेनूच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तसेच सोशल मीडियावर देखील त्यांच्या लग्नाची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. अगदी शाही थाटामाटात श्रेनू व अक्षय यांनी त्यांचा लग्नसोहळा पार पाडला.

आणखी वाचा – मुग्धा-प्रथमेशच्या लग्नामध्ये रोहित राऊत आणि त्याच्या बायकोचीच हवा, ड्रेसिंग स्टाइलने वेधलं लक्ष, म्हणाले, “आमची माऊ…”

View this post on Instagram

A post shared by Shrenu Parikh (@shrenuparikhofficial)

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये श्रेनू पारीखच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नमंडपात येताना श्रेनू भावुक झालेलीही पाहायला मिळाली. यावेळी अभिनेत्रीच्या नऊवारी साडीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय अभिनेत्रीने केलेला मराठमोळा लूक विशेष भावला. नववधूच्या नाकात नथ व पारंपरिक दागिन्यांनी साऱ्यांना भुरळ घातली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये अक्षय म्हात्रेची एंट्री पाहायला मिळाली. अक्षयने पांढर्‍या फुलांनी सजवलेल्या कारमधून एंट्री घेतली. एंट्रीदरम्यान अक्षय राजबिंडा दिसत होता. ‘बचना ए हसीनो’ या गाण्यावर डान्स करत तो आपल्या नवरीला घ्यायला आला. लग्नातील पाहुणे वराबरोबर मनसोक्त नाचताना दिसले.

आणखी वाचा – लग्नानंतर सुकन्या मोने व त्यांच्या लेकीसह सुरुची अडारकरची धमाल पार्टी, अभिनेत्रीची मुलगी दिसते इतकी सुंदर, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Shrenu Parikh (@shrenuparikhofficial)

लग्नासाठी श्रेनू व अक्षयने सुंदर पारंपरिक कपडे परिधान केले होते.श्रेनूने लाल-केशरी दुहेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर दुसरीकडे अक्षय लाल रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच हँडसम दिसत होता. श्रेणू व अक्षय यांची भेट २०२१मध्ये ‘घर एक मंदिर’ मालिकेच्या सेटवर झाली. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

Tags: akshay mhatre weddingshrenu parikhshrenu parikh marriageshrenu parikh weddingshrenu parikh wedding look
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
bollywood actor salman khan hugs amitabh and abhishek bachchan at anand pandit birthday party

Video : सलमान खानने अमिताभ बच्चन व अभिषेकला मारली मिठी, मात्र ऐश्वर्या रायवरुन रंगली जोरदार चर्चा, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.