‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची साऱ्यांनाच आतुरता लागली होती आणि अखेर मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात अडकले आहेत. नुकताच त्यांच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमधील नववधू वराचा लूक लक्षवेधी ठरत आहे. (Kartiki Gaikwad Attended Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding)
मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाला त्यांच्या मित्रपरिवाराने खास हजेरी लावत या लग्नसोहळ्याला आणखी रंगत आणली. गायक रोहित राऊत, गायिका शमिका भिडे, जुईली जोगळेकर यांनी मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाला खास हजेरी लावली. त्याचबरोबर गायिका व मुग्धाची खास मैत्रीण कार्तिकी गायकवाडनेही या लग्नाला खास हजेरी लावली होती. कार्तिकी तिच्या कुटुंबियांसह मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला उपस्थित राहिली होती. नवरा, भाऊ व वडील यांच्यासह कार्तिकी या लग्नाला गेले होती. कार्तिकी, मुग्धा व प्रथमेश हे सारेगमप या कार्यक्रमापासून एकमेकांबरोबर आहेत. त्यामुळे त्यांच्यातील ही मैत्रीदेखील खास आहे.

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न, मंडपातील व्हिडीओ व्हायरल
नुकतेच मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्यातील फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. जुईलीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये मुग्धा-प्रथमेश यांची खास रांगोळी काढण्यात आल्याचेदेखील पहायला मिळाले. लग्नात मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली असून त्यावर साजेसा शृंगार केला आहे. तर प्रथमेशने लाल रंगाचा धोतर, सदरा, त्यावर पिवळ्या रंगाचा शेला व डोक्यावर पगडी असलेला पेशवाई लूक केला होता. मुग्धा-प्रथमेश यांचा हा लग्नातील हा खास पारंपरिक लूक लक्षवेधी ठरत आहे.

मुग्धा-प्रथमेश यांचा विवाहसोहळा रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये पार पडला. आकर्षक रोषणाई, सुंदर रांगोळी व फुलांची आरास असलेल्या मंडपात हे दोघे विवाहबद्ध झाले. दरम्यान, या लग्नात मुग्धा-प्रथमेश दोघेही कमालीचे सुंदर दिसत असून त्यांचा पारंपरिक साज व साधेपणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
