शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अप्पी सिंबाला सांगणार त्याच्या बाबांची गोष्ट, अमोलच्या वाढदिवसाला तरी होणार का त्याची बाबांबरोबर भेट?, नवा प्रोमो

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 20, 2024 | 10:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amachi Collector Promo

अप्पी सिंबाला सांगणार त्याच्या बाबांची गोष्ट, अमोलच्या वाढदिवसाला तरी होणार का त्याची बाबांबरोबर भेट?, नवा प्रोमो

‘झी मराठी’ वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहेत. बऱ्याच दिवसांपासून सुरु झालेल्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला. मात्र कालांतराने या मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. त्यानंतर मालिकेत सात वर्षांचा लीप घेण्यात आला, त्यामुळे ही मालिका बदलत्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. आज या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सात वर्षांच्या लीपनंतर अप्पी, अर्जुन आणि अमोलचा बदलता प्रवास पाहायला मिळत आहे. (Appi Amachi Collector Promo)

मालिकेत आता अमोलचा वाढदिवस पाहायला मिळणार आहे. बाबांकडून मोठं गिफ्ट मिळणार असं अप्पी अमोलला सांगते. आणि ती अर्जुनला याबाबत सांगायला जाते. मात्र अर्जुन तिला काही भेटत नाही तर अर्जुनची वाहिनी अप्पीचा अपमान करुन तिला परतवून लावते. त्यांनतर वाढदिवसादिवशी अप्पी अर्जुनला त्याच्या बाबांची गोष्ट सांगायचं ठरवते.

आणखी वाचा – “जवानीमध्ये असे नखरे दाखवायचे होते”, घाणेरड्या कमेंटवर ऐश्वर्या नारकरांचं उत्तर, म्हणाल्या, “स्वतःची लायकी…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

नव्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अप्पी अमोलला त्याच्या बाबांची गोष्ट सांगत असते. यावेळी अप्पीला अश्रूही अनावर होतात. अमोलच्या वाढदिवसानिमित्त अप्पी त्याला त्याच्या बाबांची गोष्ट सांगायचा निर्णय घेते. मागील सात वर्षात अमोलला अप्पीने त्याच्या बाबांबद्दल काहीही सांगितलेलं नसतं, त्यामुळे अमोलच्या वाढदिवसानिमित्त अप्पी त्याला अर्जुनबद्दल सांगते. आता वाढिदवसाला तरी अर्जुन व अमोलची भेट होणार का हे मालिकेत पाहायला रंजक ठरणार आहे.

आणखी वाचा – सायली-अर्जुनमध्ये नवं कॉन्ट्रॅक्ट?, प्रपोजही करणार, बहरणार प्रेमाचं नातं अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट

प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अप्पी अमोलला बोलते की, “आज मी तुला तुझ्या बाबांची म्हणजेच शेहेनशहाची गोष्ट सांगणार आहे. शेहेनशहा आणि मी कायम एकत्र होतो”, यावर अमोल विचारतो, “आता का नाहीत माँ?”. त्यानंतर अप्पीला भरुन येतं. अप्पी अर्जुन बोलतोय असं भासवत अमोलला म्हणते की, “तुम्ही जेव्हा माँच्या पोटात होता ना तेव्हा मी खूप गप्पा मारायचो”, यावर अमोल विचारतो, “तुम्ही काय बोलायचात”, यावर अप्पी पुढे म्हणते, “माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे”. यावर अमोलही म्हणतो, “माझं बाबांवर खूप खूप प्रेम आहे”, असं म्हणत तो अप्पीला घट्ट मिठी मारतो. त्यावेळी अप्पी रडताना दिसते.

Tags: appi amachi collectorAppi Amachi Collector Promoentertainmentmarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Paru fame Prasad Jawade shared a video in memory of his wife Amruta Deshmukh.

Video : साताऱ्यात 'पारू'चं शूट करत असताना बायकोच्या आठवणीत प्रसाद जवादे व्याकुळ, अमृता म्हणाली, "तू माझा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.