बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : ना मुंबई, ना पुणे; मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने थेट चिपळूणमध्येच केलं लग्न, रांगोळी व फुलांनी सजलेल्या मंडपाने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 21, 2023 | 5:05 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
mugdha vaishampayan prathamesh laghate wedding rangoli decoration and look video viral on social media

ना मुंबई, ना पुणे; मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने थेट चिपळूणमध्येच केलं लग्न, रांगोळी व फुलांनी सजलेल्या मंडपाने वेधलं लक्ष

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding : गेले काही दिवस मनोरंजन विश्वातील एक कलाकार जोडी खूपच चर्चेत आहे ते म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. गेल्या काही दिवसांपासून या जोडीच्या लग्नाचा अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तेव्हापासून अनेकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच नुकतीच ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. नुकताच त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला असून त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding)

मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाला त्यांच्या मित्रपरिवाराने खास हजेरी लावत या लग्नसोहळ्याला आणखी रंगत आणली. गायक रोहित राऊत, गायिका शमिका भिडे, जुईली जोगळेकर यांनी मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाला खास हजेरी लावली आहे. नुकताच जुईलीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचा सुंदर माहोल पाहायला मिळत आहे. जुईलीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुग्धा-प्रथमेश यांची खास रांगोळी काढण्यात आली असून त्यांचा लग्नाचा अनोखा थाट पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न, मंडपातील व्हिडीओ व्हायरल

मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नात त्यांनी पारंपरिक लुक केल्याचे पाहायला मिळत आहे. या लग्नात मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली असून त्यावर साजेसा शृंगार केला आहे. तर प्रथमेशने खास पेशवाई लूक केला आहे. त्याने लाल रंगाचा धोतर, सदरा, त्यावर पिवळ्या रंगाचा शेला व पेशवाई स्टाईल पगडी परिधान करत त्याने मुग्धाच्या गळ्यात वरमाला घातली आहे. मुग्धा-प्रथमेश यांचा हा लग्नातील हा खास पारंपरिक लूक लक्षवेधी ठरत आहे.

आणखी वाचा – लाडक्या लेकीसह रुग्णालयामधून घरी परतली सई लोकूर, इतका बदलला आहे लूक, मुलीबरोबर शेअर केलेला फोटो चर्चेत

रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये मुग्धा-प्रथमेश यांचा विवाह पार पडला आहे. आकर्षक रोषणाई, सुंदर रांगोळी व फुलांची आरास करत त्यांचा विवाह पार पडला आहे. या लग्नात मुग्धा-प्रथमेश दोघेही कमालीचे सुंदर दिसत असून त्यांचा पारंपरिक साज व साधेपणा या लग्नाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.       

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Rupali Bhosale On Ankita Lokhande

"तिच्यासाठी वेगळे नियम आणि…", 'बिग बॉस'वर आरोप करत अंकिता लोखंडेला रुपाली भोसलेने सुनावले खडेबोल, म्हणाली, "वोटसाठी सुशांतचं नाव…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.