सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आशा भोसले अनंतात विलीन, मुलाने पार पाडलं कर्तव्य, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 13, 2026 | 5:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Asha Bhosle Passes Away

आशा भोसले अनंतात विलीन, मुलाने पार पाडलं कर्तव्य, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

Asha Bhosle Passes Away : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला असून संपूर्ण चित्रपट-संगीत उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. आशा भोसले यांना शनिवारी ११ एप्रिलच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आली. मात्र, आजीला प्रचंड थकवा आणि छातीत जंतुसंसर्ग होत असल्याचे नात जनाई भोसले यांनी सांगितले होते. डॉक्टर तिच्यावर उपचार करत असून ती लवकरच बरी होईल. यानंतर काल रविवार १२ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळपासून त्यांचे पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनास ठेवण्यात आले. तर शिवाजी पार्क येथे आता अखेर त्यांचे शेवटचे संस्कार करण्यात आले. अखेर आशा भोसले अनंतात विलीन झाल्या आहेत.

आशा यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली. त्यांना शेवटचे पाहण्यासाठी कलाकार, राजकीय नेते मंडळी आणि गायन क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे कुटुंब, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, नीलम गोऱ्हे, आशिष शेलार ही नेते मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास उपस्थित होती. इतकंच नाहीतर ए आर रहमान, अतुल गोगावले, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, पॅपॉन ही गायन क्षेत्रातील मंडळी ही आशा यांच्या शेवटच्या दर्शनास पोहोचली. याशिवाय, तब्बू, रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर, जॅकी श्रॉफ, सुशांत शेलार, आशुतोष गोवारीकर, सचिन पिळगांवकर ही कलाकार मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनास उपस्थित होती.

आणखी वाचा – सचिन तेंडुलकर रडला, रितेश देशमुख पाया पडला; आशा भोसलेंच्या अंत्यदर्शनाला कलाकार भावुक, ठाकरे कुटुंबीयही उपस्थित

आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. आजवर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम गाणी गायली. हिंदी व्यतिरिक्त तिने एकूण २० भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. गायनासोबतच आशा भोसले यांनी अभिनयातही हात आजमावला. २०१३ मध्ये आशा भोसले यांनी ‘माई’ या मराठी चित्रपटात काम केले होते.

Tags: asha bhosleAsha Bhosle deathAsha Bhosle Passes Away
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
shakti mohan latest interview

बॉयफ्रेंडकडून विश्वासघात, लग्न न करण्याचा निर्णय अन्…; ४० व्या वर्षी सुप्रसिद्ध कोरियोग्राफर राहतेय एकटी, मुलं नको म्हणून…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.