शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिद्धू मुसेवालाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, गायकाच्या आईने दिला बाळाला जन्म, वडिल फोटो शेअर करत म्हणाले…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 17, 2024 | 10:28 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sidhu Moosewalas mother welcome baby boy and father shares photo of late singers younger brother see the details

सिद्धू मुसेवालाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, गायकाच्या आईने दिला बाळाला जन्म, वडिल फोटो शेअर करत म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या परिवाराबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत आहे. गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचे वृत्त आले होते. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंडियन एक्सप्रेसने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर गर्भवती आहे आणि लवकरच त्यांच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील होणार आहे. 

अशातच सिद्धू मूसवालाची आई चरण कौर यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. दिवंगत गायकाचे वडील बलकौर सिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून त्यांच्या घरातील नवीन पाहुण्याच्या आगमनाविषयीच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या फोटोमध्ये, त्यांनी नुकत्याच जन्मलेल्या मुलाला आपल्या हातात धरून फोटो काढला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या दिवंगत मोठ्या मुलाचा म्हणजेच सिद्धू मुसेवालाचा फोटोदेखील आहे.

View this post on Instagram

A post shared by Balkaur Singh (@sardarbalkaursidhu)

तसेच या फोटोसह त्यांनी लिहलेल्या कॅप्शनदेखील साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या तान्ह्या मुलाबरोबरचा फोटो शेअर कत त्यांनी असं म्हटलं आहे की, “शुबदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांच्या आशीर्वादाने शुभच्या धाकट्या भावाला परमेश्वराने आमच्या हातात ठेवले आहे. वाहेगुरुच्या आशीर्वादाने संपूर्ण कुटुंब निरोगी आहे आणि मी सर्व हितचिंतकांचा त्यांच्या अपार प्रेमाबद्दल आभारी आहे”.

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : सूर्यदेवाच्या कृपेमुळे ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी, कोणाला मिळणार आर्थिक फायदा?

सिद्धू मूसवालाचे काका चमकौर सिंह यांनी चरण कौर यांच्या गरोदरपणाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. यावेळी त्यांनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) द्वारे नवीन सदस्य आणण्याविषयी सांगितले होते. अशातच त्यांच्या घरात एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे सिद्धू मुसेवालाच्या अनेक चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : पोटाला भाजलं असतानाही सारा अली खानचं रॅम्पवॉक, चटक्याचे डागही न लपवल्यामुळे चर्चा, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाने त्याच्या गाण्यातून अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. गायक आज शरीररूपाने आपल्यात नसला तरी तो त्याच्या गाण्यांमधून चाहत्यांच्या मनात कायम आहे. सिद्धू मुसेवालाची काही गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावर प्रचंड मोठा जनाक्रोष पाहायला मिळाला होता. त्यांचे अनेक चाहते आजही सिद्धू मुसेवालाच्या आठवणीत व्यथित होत असल्याचे पाहायला मिळते. अशातच आता गायकाच्या घरून एक आनंदवार्ता आली आहे.

Tags: Sidhu moosewalaSidhu Moosewala Mother
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Kunya Rajachi Tu Ga Rani is going off air harshad atkari and sharvari jog shared emotional posts on social media

‘कुण्या राजाची तू गं राणी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांनी शेअर केल्या भावुक पोस्ट, म्हणाले, “प्रवास थांबत असला तरी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.