कोणत्याही परिस्थितीत आपली कला सादर करणे आणि प्रेक्षकांचे मनोरंजण करणे हे कलाकार आपले आदी कर्तव्य मानत असतो आणि या कर्तव्याची तो आपल्या परीने पूर्ततादेखील करत असतो. अगदी आभाळ कोसळलं तरीदेखील मनोरंजनासाठी दिलेला शब्द पाळणे हे यासाठी प्रत्येक कलाकार सचोटीने मेहनत करत असतो. आपल्या कामाप्रति निष्ठा ठेवून अशीच सचोटीने काम करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान.
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर साराने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. लवकरच साराचे दोन नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या सारा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका प्रमोशन कार्यक्रमादरम्यान सारा अली खानबरोबर अपघात घडला आहे. ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सारा जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिचे पोट भाजले आहे.
साराचे पोट भाजूनही तिने नुकतीच एका फॅशन शोच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी पोटाला जखम झालेली असूनही साराने या शोमध्ये फॅशन वॉक करत तिच्या मनमोहक सौंदर्याची अदा दाखवली. साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
साराचा रॅम्पवॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी “या लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. जखम होऊनही सारा अगदी सुंदरपणे तिचा स्टायलिश अंदाज दाखवत आहे, साराने जखम न लपवतादेखील तिचा हा हटके लूक केला आहे, सारा खरंच खूप खंबीर व सक्षम अभिनेत्री आहे” असं म्हणत तिचे कौतुक केले आहे.
दरम्यान, साराने सुंदर नक्षीकाम असलेला भरजरी लेहंगा परिधान करत फॅशन वॉक केला होता. साराच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी साराच्या या खास लूकचे कौतुकही केले आहे.