गेल्या काही दिवसांपासून दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या परिवाराबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत आहे. गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचे वृत्त आले होते. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंडियन एक्सप्रेसने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर गर्भवती आहे आणि लवकरच त्यांच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील होणार आहे.
अशातच सिद्धू मूसवालाची आई चरण कौर यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. दिवंगत गायकाचे वडील बलकौर सिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून त्यांच्या घरातील नवीन पाहुण्याच्या आगमनाविषयीच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या फोटोमध्ये, त्यांनी नुकत्याच जन्मलेल्या मुलाला आपल्या हातात धरून फोटो काढला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या दिवंगत मोठ्या मुलाचा म्हणजेच सिद्धू मुसेवालाचा फोटोदेखील आहे.
तसेच या फोटोसह त्यांनी लिहलेल्या कॅप्शनदेखील साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या तान्ह्या मुलाबरोबरचा फोटो शेअर कत त्यांनी असं म्हटलं आहे की, “शुबदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांच्या आशीर्वादाने शुभच्या धाकट्या भावाला परमेश्वराने आमच्या हातात ठेवले आहे. वाहेगुरुच्या आशीर्वादाने संपूर्ण कुटुंब निरोगी आहे आणि मी सर्व हितचिंतकांचा त्यांच्या अपार प्रेमाबद्दल आभारी आहे”.
सिद्धू मूसवालाचे काका चमकौर सिंह यांनी चरण कौर यांच्या गरोदरपणाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. यावेळी त्यांनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) द्वारे नवीन सदस्य आणण्याविषयी सांगितले होते. अशातच त्यांच्या घरात एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे सिद्धू मुसेवालाच्या अनेक चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Video : पोटाला भाजलं असतानाही सारा अली खानचं रॅम्पवॉक, चटक्याचे डागही न लपवल्यामुळे चर्चा, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाने त्याच्या गाण्यातून अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. गायक आज शरीररूपाने आपल्यात नसला तरी तो त्याच्या गाण्यांमधून चाहत्यांच्या मनात कायम आहे. सिद्धू मुसेवालाची काही गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावर प्रचंड मोठा जनाक्रोष पाहायला मिळाला होता. त्यांचे अनेक चाहते आजही सिद्धू मुसेवालाच्या आठवणीत व्यथित होत असल्याचे पाहायला मिळते. अशातच आता गायकाच्या घरून एक आनंदवार्ता आली आहे.