बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक कपल म्हणजे कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा. ही जोडी डेटिंगच्या दिवसांपासून ते अगदी त्यांच्या लग्नापर्यंत चर्चेत राहिली. दोघांनी आपल्या केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आणि चाहत्यांची मने जिंकली. ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि तेव्हापासून त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. सिद्धार्थचा ‘योद्धा’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं एक स्पेशल स्क्रीनिंग गुरुवारी ठेवण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. इतकंच नाही तर सिद्धार्थ व त्याची पत्नी कियाराच्या आई-वडिलांनीही हजेरी लावली होती. (Sidharth Malhotra Family Video)
सध्या दोघेही त्यांच्या आगामी ‘योधा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या प्रीमिअरला सिद्धार्थ मल्होत्रा त्याची पत्नी कियारा अडवाणीबरोबर पोहोचला. पापाराझींसमोर पोज देताना हे कपल खूपच क्यूट दिसत होतं. केवळ कियाराच नाही तर संपूर्ण अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबही सिद्धार्थच्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सामील झाले. सिद्धार्थला पाठिंबा देण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित असलेलं पाहायला मिळालं. एका फोटोसाठी पापाराझींना पोज देताना संपूर्ण कुटुंब एकत्र आले.
‘योद्धा’ च्या स्क्रीनिंमधून काही व्हिडीओ समोर आले आहेत. पापाराझी अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेले सिद्धार्थचे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ व्हिलचेअरवर बसलेल्या वडिलांची काळजी घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत, तसेच व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘प्रत्येक वडिलांना असाच मुलगा हवा असतो,’ ‘आज मी इंटरनेटवर पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट,’ ‘सिद्धार्थच्या वागण्यावरून त्याच्या आई-वडिलांनी दिलेले चांगले संस्कार दिसतात,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी सिद्धार्थच कौतुक केलं आहे.
‘एबीपी कॉन्क्लेव्ह’ मधील एका संभाषणात कियारा अडवाणी तिच्या आयुष्याबद्दल बोलली. यावेळी बोलताना ती म्हणाली की, तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा तिची खूप काळजी घेतो आणि तिचे खूप लाड करतो. याशिवाय, तिने हे देखील सांगितले की, तिच्यासाठी वैयक्तिक व व्यावसायिक दोन्ही सांभाळणं किती सोपे झाले आहे”.