शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी त्यांच्यासारखी नाही”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा जया बच्चन यांना टोमणा, म्हणाल्या “मी त्यांच्यापेक्षा खूप…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 15, 2024 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Moushumi Chatterjee taunted jaya bachchan to paparazzi says i am much better than her

“मी त्यांच्यासारखी नाही”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा जया बच्चन यांना टोमणा, म्हणाल्या “मी त्यांच्यापेक्षा खूप...”

पापाराझी व जया बच्चन यांच्यात कोणत्या प्रकारचे नाते आहे हे आता जवळपास सर्वांनाच माहीत आहे. जया बच्चन व पापराझी हे शब्द ऐकले किंवा वाचले तरी डोळ्यासमोर जया बच्चन यांचा रागीट चेहरा आणि पापाराझींचा मॅडम एक फोटो अशी विनंती करतानाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. फार क्वचित प्रसंगीच जया बच्चन पापाराझींवर रागावल्या नसतील. नाहीतर त्या दरवेळेस पापाराझींना फोटोसाठी कायम नकारच देत असतात. त्यांच्या या कृतीचे काही जण समर्थन करत त्यांना पाठिंबा देतात, मात्र काहीजण त्यांच्या या कृतीवर टीकाही करतात.

अशातच आता जया बच्चन पापाराझींना देत असलेल्या वागणुकीवर नेटकऱ्यांसह मौसमी चटर्जींनी त्यांची खिल्ली उडवली आहे. मौसमी चॅटर्जींना नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा मौसमी यांनी काही पोज देत फोटो कढले. मात्र काही वेळाने त्या चिडल्या. तेव्हा कुणीतरी त्यांची तुलना जया बच्चन यांच्याशी केली. यावर “मी जया बच्चन यांच्यासारखी नाही” असं म्हणत मौसमी चटर्जींनी त्याला उत्तर दिले. यापुढे त्या “ मी त्यांच्यापेक्षा खूप चांगली आहे. लक्षात ठेवा. जर तुम्ही नसता तर आम्ही तरी कुठे असतो?” असंही म्हणाल्या.

View this post on Instagram

A post shared by Namaste Bollywood (@namastebollywood.in)

आणखी वाचा – Video : ‘नाम तुझे घेता देवा’, भजनात दंग झाले मुग्धा व प्रथमेश, टाळ-मृदंगाचा जयघोष करत केली गायनसेवा, खास व्हिडीओही केला शेअर

जया बच्चन व मौसमी चॅटर्जी एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी असल्याची माहिती आहे. एका मुलाखतीत मौसमी चटर्जींनी गुलजार यांच्या ‘कोशिश’ या चित्रपटात जया बच्चन यांनी त्यांची जागा कशी घेतली होती याचा खुलासा केला होता. या चित्रपटासाठी मौसमी यांनी तीन दिवस शूटिंगही केल्याचे मौसमी यांनी सांगितले होते. पण जया बच्चन यांची सेक्रेटरी सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाच्या सेटवरच असल्याचे त्यांनी पाहिले आणि मग अचानक एके दिवशी गुलजारांनी चित्रपटात मौसमी चॅटर्जी यांच्याऐवजी जया बच्चन यांना घेतले.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : कर्क ते कुंभपैकी कोणाचं नशिब आज उजळणार?, कोणाला मिळणार अधिक धन?, जाणून घ्या तुमचं भविष्य

तसेच दोघांच्या सध्याच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, जया बच्चन अजूनही चित्रपटांमध्ये काम करत आहेत. गेल्या वर्षात आलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्या दिसल्या होत्या. पण मौसमी चॅटर्जी २०१३ पासून चित्रपट व अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत. मात्र, २०२३ मध्ये ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर-३’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये पाहुण्या म्हणून आल्या होत्या.

Tags: jaya bachchanMoushumi Chatterjee
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Priyanka Chopra With Daughter

लेकीसह भारतात परतली प्रियांका चोप्रा, दिसते इतकी सुंदर की सगळेच पाहत बसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.