मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्रेया, भारत, कुशल नव्या शोमध्ये का नाहीत?, निलेश साबळेनं स्पष्टच सांगितलं, म्हणाला, “चॅनलने आमच्याबरोबर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 2, 2024 | 12:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
nilesh sabale on chala hawa yeu dya actors

श्रेया, भारत, कुशल नव्या शोमध्ये का नाहीत?, निलेश साबळेनं स्पष्टच सांगितलं, म्हणाला, “चॅनलने आमच्याबरोबर...”

‘झी मराठी’ वाहिनीवरील चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने तब्बल दहा वर्ष पप्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र हे आजही सर्वांच्या लक्षात आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता, लेखक निलेश साबळेनी स्वीकारली होती. त्याच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. तसेच या कार्यक्रमामध्ये श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके यांनीदेखील आपल्या अभिनयाने सर्व महाराष्ट्राला खळखळून हसवले. मात्र नुकताच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर निलेशचा ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर एक नवीन कार्यक्रम सुरू केला. यावेळी त्याने या कार्यक्रमातील इतर कलाकारांबद्दल भाष्य केले आहे. (nilesh sabale on chala hawa yeu dya actors )

निलेश सध्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाचा लेखक व सूत्रसंचलन करत आहे. २७ एप्रिलपासून  हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर त्याने ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली.  या कार्यक्रमामध्ये त्याच्याबरोबर भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम हे दिसले. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडलाच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. मात्र प्रेक्षकांनी जुनी कलाकार मंडळी नसल्याने अनेक प्रश्न विचारले. मुलाखतीवेळी त्याला विचारण्यात आले की, “तुमच्या या कार्यक्रमामध्ये जून कलाकार म्हणजे श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळतील का?”, त्यावर निलेशने उत्तर दिले की, “हा कार्यक्रम पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे नवीन कलाकार तुम्हाला बघायला मिळत आहे. श्रेया एक उत्तम अभिनेत्री आहे. तसेच भारत व कुशल हेदेखील कमालीचे कलाकार आहेत. पण आता काही तांत्रिक बाबींमुळे आम्ही एकत्र नाही आहोत”.

आणखी वाचा – सलमान खानच्या  घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या, नेमकं घडलं तरी काय?

पुढे त्याने सांगितले की, “याचे कारण म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम जेव्हा थांबणार होता तेव्हा तो काही महिन्यांसाठी थांबवण्यात येणार होता. त्यामुळे मी नवीन काहीतरी करूया असा निर्णय घेतला. पण त्यावेळी चॅनलने आमच्याबरोबर एक वर्ष राहण्याचा करार केला होता. त्यामुळे ज्यांनी त्या करारावर सही केली ते सध्या ‘झी वाहिनी’बरोबरच आहेत. पण आम्ही सही न केल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर नाही आहोत”.

आणखी वाचा – मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुलीचा भाजपामध्ये प्रवेश, म्हणाली, “नरेंद्र मोदी यांना…”

दरम्यान निलेशच्या या नवीन कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण भाऊ  ओंकार यांना स्कीट दरम्यान स्त्रीवेशात पाहिल्याने चाहत्यांनी नाराजीदेखील दर्शवली होती.

Tags: chala hawa yeu dyahastay na ? hasaylac pahijenew shownilesh sabale
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
aishwarya narakar on comments

“ते खूप घाण दिसतात”, नवऱ्याच्या लूकवरुन सुनावणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “चांगलं व वाईट दिसणं...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.