प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर व अभिनेता शोएब इब्राहिम हे काही दिवसांपूर्वी आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. मात्र, बाळाचा जन्म वेळेपूर्वी झाला असल्याने त्याला काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच दीपिका व तिच्या बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. दरम्यान, जन्मानंतर या जोडीने त्यांच्या मुलाबरोबर अनेक फोटोज शेअर केले होते. पण त्याचा चेहरा दाखवला नव्हता. अखेर या दोघांनी त्यांच्या मुलाची एक झलक त्यांच्या चाहत्यांना दाखवली आहे. (Dipika Kakar and Shoaib Ibrahim reveals their son face)
शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिका व शोएब यांनी त्यांचा मुलाचा चेहरा समोर आला असून हे दोघे मुलगा रुहानसह दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना शोएब म्हणाला, “मी तुम्हा सर्वांना आमच्या ‘रुहान’ची ओळख करून देत आहोत. बाळाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.” हा संपूर्ण व्हिडिओ त्याच्या युट्युब चॅनलवर शेअर केल्याची माहिती त्याने दिली.
हे देखील वाचा – “तिच्यासाठी वेळ…”, १६ वर्षीय लेकीने आत्महत्या केल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, “मीही मेलो आहे अन्…”
शोएबची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टवर टीव्हीविश्वातील कलाकारांसह अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत बाळाप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या युट्युब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळाचा चेहरा दाखवण्याबरोबर तो कुटुंबियांसह त्याचा तीन महिन्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – “मुलीला पाहून ५,६ वेळा रडलो…”, मुलीला पहिल्यांदा पाहताक्षणी राहुल वैद्यची झाली होती ‘ही’ अवस्था, म्हणाला, “जेव्हा मी तिला…”
अभिनेता शोएब इब्राहिम व दीपिका कक्कर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत झळकले आहे. त्यादरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. २०१८ मध्ये या दोघांनी लग्न केलं. यावर्षीच्या २१ जूनमध्ये त्यांनी रुहानला जन्म दिला. अभिनेत्री बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावर दिसली नाही. मात्र, ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तीदेखील तिच्या युट्युब चॅनलवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते.