शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा व राघव चड्ढाच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर, पाहुण्यांना ‘ही’ गोष्ट वापरण्याची आहे मुभा

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 22, 2023 | 10:08 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update

राघव चड्ढा परिणिती चोप्रा लग्न

Raghav Parineeti Wedding : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच हे दोघे विविहबंधनात अडकणार असून सध्या त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. या विधींना दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्या फोटोजना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तर दुसरीकडे परिणीती व राघवच्या डान्सचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding)

दरम्यान, परिणीती आणि राघव यांचा विवाहसोहळा उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु असून या सोहळ्याला अनेक व्हीव्हीआयपी येणार असल्याने विशेष सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सध्या अनेक सेलिब्रिटींच्या लग्नांमध्ये नो-फोन पॉलिसी अवलंबली जात आहे. त्यामुळे ही जोडीसुद्धा त्यांच्या लग्नात नो-फोन पॉलिसी राबवणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आता याबाबत मोठी माहिती समोर आली असून परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांच्या लग्नात नो-फोन पॉलिसीची अंमलबजावणी होणार नसल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे. याचा अर्थ, परिणीती-राघवच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना मोबाईल वापरता येणार आहे.

हे देखील वाचा – “कंटाळून त्यांनी आत्महत्या…”, तनुश्री दत्ताचे राखी सावंतवर गंभीर आरोप, म्हणाली, “राखीला मानसिक…”

View this post on Instagram

A post shared by pari-obsessed | naman (@parineetichopra_obsession)

याचे कारण म्हणजे, परिणीती व राघवच्या लग्नात दोन्ही कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे व मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार असल्याने दोघांच्या लग्नावेळी पूर्ण गोपनियता पाळी जाणार आहे. त्यामुळे या लग्नात नो-फोन पॉलिसी राबवली जाणार नसल्याची माहिती आली आहे. दरम्यान, परिणितीच्या लग्नात अभिनेत्री प्रियांका चोप्रासह अनेक बॉलिवूड कलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. १३ मेला या दोघांचा साखरपुडा सोहळा पार पडला असून येत्या २४ तारखेला हे दोघं शाही थाटात लग्न करणार आहेत.

Tags: Parineeti ChopraParineeti Chopra Raghav Chadha Wedding
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Rahul talk about new born baby girl name

मुलीचं नाव काय ठेवणार? याबाबत राहुल वैद्यचा खुलासा, म्हणाला, "नावं काढली आहेत पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.