एकामागोमाग एक मराठी चित्रपट सध्या सिनेसृष्टीत धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत. अशातच यांत भर घालत आणखी एका चित्रपटाची लवकरच भर पडणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘झिम्मा २’. याआधी आलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यानंतर आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला झिम्मा २ हा चित्रपट येत आहे. चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तेव्हापासून चाहत्यांच्या मनात चित्रपटाबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Siddharth Mitali Dance)
चित्रपटाचा टीझर लॉंच झाल्यावर यातील “मराठी पोरी…” हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गणयने अल्पावधीतच प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं. या गाण्यामध्ये चित्रपटातील इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. या गाण्यातून स्त्रीत्वाचे अनेक पदर उलगडताना दिसले. स्त्रियांवर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतंय.
“मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…” हे गाणं प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांनी या गाण्याला डोक्यावर उचलून धरलं. या गाण्यावर नेटकरी, सिनेविश्वातील अनेक कलाकार रिल्स बनवत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत आपल्याला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पाहायला मिळतोय. हे गाण्यावर सिद्धार्थ त्यांची धर्मपत्नी अभिनेत्री मिताली मयेकरसह थिरकला. मिताली व सिद्धार्थला या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. सिद्धार्थने त्याच्या घरी बायकोसह भन्नाट डान्स करत व्हिडीओ शेअर केला.
मिताली सिद्धार्थने मराठी पोरी या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने “मराठी पोरी with मराठी बायको!” असं हटके कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अत्यंत कमी कालावधीत सिद्धार्थ मितालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत या दोघांचं कौतुक केलं आहे आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.