मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक याने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना मनोरंजन करत आला आहे. नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये विविध पात्र त्याने साकारली आहे. या सर्व पात्रांमध्ये त्याने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबर तो उत्तम गायकही आहे. शिवाय, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले, ज्याची बरीच चर्चा झाली होती. प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तो यावर विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतंच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, जो व्हायरल होताना दिसत आहे. (prasad oak family tour)
प्रसाद त्याचा मुलगा सार्थकला भेटण्यासाठी कुटुंबियांसह विदेश दौऱ्यावर गेला. त्यावेळचे काही फोटोज नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे फोटोज विमानातून घेतलेले असून ज्यामध्ये प्रसादची पत्नी मंजिरी व लेक मयांक दिसत आहे. प्रसादने यावेळी काळ्या रंगाचा टीशर्ट व पॅन्ट, त्यावर हिरव्या रंगाची जॅकेट परिधान केलं आहे. त्याने या पोस्टला “कौटुंबिक सहल… सार्थक ओक लवकरच भेटू या”, असं कॅप्शन दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या स्टोरीमध्ये विमानतळाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
हे देखील वाचा – Video : “पप्पी कोणाची घ्यायची…”, मरीन ड्राईव्हवरील प्रेमी जोडप्यांचा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरची पोस्ट, म्हणाला, “यांचा…”
प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते व कलाकार यावर कमेंट करताना दिसतात. अभिनेता क्षितिश दाते याने या पोस्टवर “एकदम बारीक होतंय”, अशी कमेंट केली आहे. तर, आदिनाथ कोठारे, विभावरी देशपांडे यांनीही यावर कमेंट केली आहे. त्याचबरोबर, चाहत्यांनीही प्रसादच्या पोस्टवर कमेंट करत त्याला या प्रवासासाठी व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – कागदाचे आकाश कंदील मिळत नसल्यानं प्रिया बापटची खंत, म्हणाली, “प्लास्टिकचे कंदील बघून…”
प्रसाद आपल्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून नेहमी दिसतो. काही दिवसांपूर्वी त्याने ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचं शूट पूर्ण केलं होतं, त्याबद्दलची एक पोस्टदेखील केली होती. शिवाय, त्याच्याकडे ‘धर्मवीर २’, ‘जिलबी’ यांसारखे अनेक चित्रपट असून त्या सर्व चित्रपटांच्या शूटमध्ये व्यग्र आहे. सध्या त्याच्या मुलाला भेटण्यासाठी त्याने कामातून ब्रेक घेतला. लवकरच प्रसादचे ‘वडापाव’ आणि ‘पठ्ठे बापूराव’ हे दोन दिग्दर्शित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.