बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाला नकार दिल्यामुळे ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्यावर टाकण्यात आला बहिष्कार, स्वत:च खुलासा करत म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 10, 2024 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Siddhant Chaturvedi revealed that he was boycotted for refusing the film Brahmastra see the details

‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाला नकार दिल्यामुळे ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्यावर टाकण्यात आला बहिष्कार, स्वत:च खुलासा करत म्हणाला...

बॉलीवूड मनोरंजन विश्वातील नवोदित अभिनेता म्हणून सिद्धांत चतुर्वेदीकडे पहिले जाते. बॉलीवूडमधील काही तरुण व उमद्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचे नाव येते. सिद्धांतने त्याच्या अवघ्या दोनच चित्रपटांद्वारे चाहत्यांमध्ये  आपली लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेत्याने रणवीर सिंहबरोबर ‘गल्ली बॉय’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तो दीपिका पदुकोणबरोबर ‘गहरिईयां’ चित्रपटामध्ये दिसला होता. अशातच सिद्धांतने ‘ब्रह्मास्त्र’सारख्या मोठ्या चित्रपटाला नकार दिल्यामुळे त्याला बॉलीवूडमधून बहिष्कार टाकण्यात आला असल्याचा खुलासा केला आहे.

नुकतंच ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धांतने याविषयी सांगताना असं म्हटलं की, “मला ‘गल्ली बॉय’च्या एक महिना आधी ‘ब्रह्मास्त्र’बाबत विचारण्यात आले होते. एका कास्टिंग दिग्दर्शकाच्या माध्यमातून मला या चित्रपटाबाबत विचारण्यात आले होते. पण चित्रपटासाठी मला स्क्रिप्ट किंवा ऑडिशन घेण्यात आले नव्हते. त्याने मला फक्त तू मार्शल आर्ट करतोस का? कारण हा एक ॲक्शनने भरलेला चित्रपट आहे. म्हणून तो म्हणाला की मी हे करावे आणि हा एक व्हीएफएक्सने भरलेला प्रकल्प आहे आणि त्याला बनवायला ५ वर्षे लागतील.”

View this post on Instagram

A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi)

आणखी वाचा – बॉयफ्रेंडसह लग्न करण्यासाठी दुबईमध्ये गेली ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री, पण त्यानेच फसवलं, तुरुंगातही जावं लागलं अन्…

यापुढे सिद्धांतने असं म्हटलं की, “मी कास्टिंग दिग्दर्शकाला सांगितलं की मी हा चित्रपट करू शकणार नाही.” यावर तो दिग्दर्शक उभा राहिला आणि म्हणाला, ‘तू वेडा आहेस का? या चित्रपटामुळे तू (धर्मा प्रोडक्शन)बरोबर जोडला जाणार आहेस?” यावर मी म्हणालो, “चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसारखे कलाकार असतील. तर मला कोण बघेल? आणि त्यात मला चित्रपटात एकही संवाद नाही, तर मला लोक बघणारच नाहीत.”

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांसाथी आजचा दिवस ठरणार वरदान, धनप्राप्ती व नोकरीत बढतीचाही आहे योग, जाणून घ्या…

‘ब्रम्हास्त्र’नंतर सिद्धांतचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आल्याचेही त्याने सांगितले. तसेच सिद्धांतला वेडा, रागीट आणि अंधश्रद्धाळू म्हणून बदनाम केले असल्याचेही त्याने म्हटले, दरम्यान, सिद्धांत चतुर्वेदी नुकताच अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांच्यासह ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटामध्ये दिसला होता

Tags: bollywood actorBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsSiddhant Chaturvediबॉलीवूड अभिनेताबॉलीवूड बातमीबॉलीवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीसिद्धांत चतुर्वेदी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat kohli connection with premanand maharaj
Entertainment

प्रेमानंद महाराजांच्या आशिर्वादामुळे विराट कोहलीला यश, एका भेटीनंतर गणित बदललं अन्…; सोशल मीडियावर तुफान चर्चा

जून 4, 2025 | 2:20 pm
Sshura Khan Baby Bump
Entertainment

अरबाज खान होणार बाबा, पत्नी शुराचा बेबी बंब पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद, काळजीपूर्वक पाऊल टाकतानाही दिसली आणि…

जून 4, 2025 | 1:14 pm
avantika malik on divorce with imran khan
Entertainment

“मी आता मरणार असं वाटत होतं आणि…”, इमरान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितलं घटस्फोटाचं सत्य, हालत अशी की…

जून 4, 2025 | 12:56 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

कॅन्सरमुळे निधन झालेल्या अभिनेत्याच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, सिनेसृष्टीतील जवळच्या मित्राने दिला खांदा, आजारपणातही केली होती आर्थिक मदत

जून 4, 2025 | 12:34 pm
Next Post
Somi khan talked about her intimate wedding with rakhi sawant ex husaband adil khan durrani

“आम्ही गुपचुप लग्न...”, आदिल खानबरोबरच्या नात्याबद्दल सोमी खानची प्रतिक्रिया, म्हणाली, “नकारात्मकता, वाद...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.